भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव बुधवारी (14 सप्टेंबर) त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत असत आहे. अलिकडच्या काही दिवसांमध्ये सूर्यकुमार जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला आहे. त्याने स्वतःच्या ताबडतोड फलंदाजीच्या जोरावर सर्वांचीच मने जिंकली आहेत. याच पार्श्वभूमीवर त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधीही मिळत आहे. त्याची पत्नी देविशा शेट्टी हिने सूर्यकुमारला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास पोस्ट केली आहे.
सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) त्याच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताचा टी-20 फॉरमॅटमधील महत्वाचा फलंदाज बनला आहे. तो सध्या आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत (ICC T20 Ranking) चौथ्या क्रमांकावर आहे. एक वेळ अशी आली होती, सूर्यकुमार पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याला मागे टाकणारच होता, परंतु तसे होऊ शकले नाही. त्याने आशिया चषकात हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम प्रदर्शन केले होते आणि चाहत्यांकडून यासाठी त्याचे मोठ्या प्रमाणात कौतुक देखील झालेले.
सूर्यकुमारची पत्नी देविशा शेट्टी (Devisha Shetty) हिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी इंस्टाग्रामवर खास पोस्ट केली आहे. तिने लिहिले की, “वाढदिेवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेबी. मी तुला एका 20 वर्षीय युवकापासून 32 वर्षांच्या प्रौढ मानसात बदलताना पाहिले आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम केले आहे आणि आता त्यापेक्षा जास्त करते. तुझ्यासाठी आभारी आणि कृतज्ञ आहे. तु माझ्यासाठी संपूर्ण घराप्रमाणे आहेस. अंधाऱ्या दिवसांमध्ये सूर्यप्रकाशाप्रमाणे आहेत आणि माझ्या डोळ्यांतील चांदणे देखील तूच आहेस. तुझ्यावर नेहमी प्रेम करत राहिली.”
https://www.instagram.com/p/Cidb-q5PCWi/?utm_source=ig_web_copy_link
दरम्यान, सूर्यकुमार यापूर्वी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना अनेक सामन्यांध्ये ताबडतोड फलंदाजी केली आहे. या खेळाडूला मैदानाच्या चारही बाजूंना मोठे शॉट्स खेळण्यासाठी ओळखले जाते. कोणत्याही गोलंदाजासाठी सूर्यकुमार नेहमीच मोठी बाधा ठरत आला आहे आणि त्याला बाद करणे त्यांच्यासाठी नक्कीच सोपी गोष्ट नसते. आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्ससाठी त्याने अशीच चमकदार कामगिरी केली आहे. त्याला यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचकासाठीही संधी दिली गेली आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या टी-20 विश्वचषकासाठी बीसीसीआयने सोमवारी (12 सप्टेंबर) संघ घोषित केला, ज्यामध्ये सूर्यकुमारलाही सामील केले गेले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
धक्कादायक! संघनिवडीच्या बैठकीत संजूचे नावही घेतले नाही; बीसीसीआय अधिकाऱ्याचा खुलासा
आयपीएल 2023पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठी घडामोड! जयवर्धनेंचा प्रशिक्षकपदावरून राजीनामा, कारण…
आशिया चषकातील ‘विराट’ प्रदर्शनाचा कोहलीला फायदा, टी20 क्रमवारीत 14 स्थानांची उडी