---Advertisement---

AUS vs NZ | कॉनवेच्या वादळी खेळीमुळे विराटला तोटा, खास यादीत महत्वाचा बदल

Devon Conway
---Advertisement---

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 ची सुपर 12 फेरी शनिवारी म्हणजेच 22 ऑक्टोबर रोजी सुरू झाली. सुपर बारा फेरीतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलिया आणि त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी न्यूझीलंड या संघात खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला. सलामीवीर डेवॉन कॉनवे याने वादळी खेळी करत संघाची धावसंख्या 200 पर्यंत पोहोचवली. यादरम्यान, कॉनवेच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद देखील झाली. 

न्यूझीलंडचे या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलियन कर्णधार ऍरॉन फिंच (Aaron Finch) याचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण गोलंदाज अपेक्षित प्रदर्शन करू शकले नाही. न्यूझीलंडचे सलामीवीर फिन एलन (Finn Allen) आणि डेवॉन कॉनवे यांनी संघाला चांगली सुरुवात केली. एलनने अवघ्या 16 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 42 धावा केल्या. वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड याने डावातील पाचव्या षटकात एलनला तंबूत धाडले. दुसरा सलामीवीर डेवॉन कॉनवे (Devon Conway) मात्र शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला. कॉनवेने 58 चेंडूत नाबाद 92 धावा केल्या. 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने या धावा त्याने केल्या.

कॉनवे या सामन्यातील वादळी खेळीच्या जोरावर एका खास यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. कॉनवे आता ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात मोठी टी-20 खेळी करणारा फलंदाज बनला आहे. हा विक्रम यापूर्वी विराट कोहली (Virat Kohli) याच्या नावावर होता. आता कॉनवे या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. विराट कोहीलने 2016 साली ऑस्ट्रेलियात खेळलेल्या एका टी-20 सामन्यात नाबाद 90 धावा केल्या होत्या आणि आता ही खेळी यादीत दुसऱ्या क्रमांकावर आली आहे. यादीतील तिसऱ्या क्रमांकाची खेळी देखील विराटच्याच नावावर आहे. विराटने 2020 साली ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळलेल्या टी-20 सामन्यात 85 धावांची खेळी केली होती, जी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मायदेशात सर्वाधिक धावांची खेळी करणारे फलंदाज (टी-20/पुरुष) 
92* – डेवॉन कॉनवे – न्यूझीलंड (2022)
90* – विराट कोहली – भारत (2016)
85 – विराट कोहली – भारत (2020)

दरम्यान, उभय संघातील या सामन्याचा विचार केला, तर न्यूझीलंडने मर्यादित 20 षटकांमध्ये तीन विकेट्सच्या नुकसानावर 200 धावा केल्या. सलामीवीर जोडीव्यतिरिक्त न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विलियम्सन 23 चेंडूत 23 धावांचे योगदान देऊ शकला. चौथ्या क्रमांकावरील ग्लेन फिलिप्स 10 चेंडूत 12 धावा करू शकला. तसेच जेम्स निशमने शेवटच्या काही षटकांमध्ये 13 चेंडूत महत्वाच्या 23 धावा केल्या.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध द्विशतक ठोकत न्यूझीलंडने टी20 विश्वचषकात रचला इतिहास, वाचा काय केलाय पराक्रम
‘राशिद खान असेल इंग्लंडसाठी सर्वात मोठा धोका’, माजी कर्णधाराने आधीच केले सावध 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---