आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे १८ जूनपासून होणार आहे. या सामन्याआधी, भारतीय संघ मुंबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाईन असून न्यूझीलंड इंग्लंडमध्ये जोरदार सराव करीत आहे. या सरावात न्यूझीलंडला आता एक नवा चेहरा मिळाला असून तो लवकरच संघात सलामीवीरच्या भूमिकेत दिसेल. हा खेळाडू डेवॉन कॉनवे आहे, ज्याने मागील वर्षी न्यूझीलंडकडून टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि आता तो अवघ्या ८ महिन्यांत कसोटी कारकीर्द सुरू करण्याच्या जवळ आहे.
इंग्लंड विरुद्ध २ जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात कॉनवे न्यूझीलंडकडून सलामीला येऊ शकतो.
कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंडचे पथक आपापसात सराव सामना खेळत आहे. टॉम लॅथम ११ आणि केन विलियम्सन ११ यांच्यातील या सामन्यात कॉनवे लॅथमच्या संघासाठी खेळतोय. सामन्याच्या पहिल्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना कॉनवेने ५५ धावा केल्या आणि त्यानंतर निवृत्त झाला. कॉनवेने कर्णधार लॅथमसह १०६ धावांची सलामी भागीदारी केली.
या खेळीच्या जोरावर कॉनवेने कसोटी मालिकेसाठी सलामीवीर म्हणून आपला दावा आणखी मजबूत केला आहे. या नाबाद खेळीनंतर कॉनवेने केन विलियम्सन गलीमध्ये उभा राहून आपला खेळ पाहत आहे, हे पाहून भीती वाटत होती असे म्हटले.
What was on Devon Conway's mind during his first session batting in whites in a BLACKCAPS environment? #ENGvNZ pic.twitter.com/5ZTvaRfvZq
— BLACKCAPS (@BLACKCAPS) May 28, 2021
कॉनवे मूळचा दक्षिण आफ्रिकेचा आहे, जिथे त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र, तेथे त्याला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जास्त संधी मिळाल्या नव्हत्या आणि अशा परिस्थितीत त्याने देश सोडला आणि सुमारे ४ वर्षांपूर्वी न्यूझीलंडला आला. न्यूझीलंडमध्ये आल्यानंतर कॉनवेचे भाग्य खूप बदलले.
वेलिंग्टन फायरबर्ड्सकडून खेळत त्याने १७ प्रथमश्रेणी सामन्यात चार शतकांसह १५९८ धावा केल्या. त्याची धावांची सरासरी ७२.६३ आहे. या काळात ३२७ धावांची नाबाद खेळी त्याने खेळली. याशिवाय वनडे आणि टी२० स्पर्धांमध्येही त्याने भरपूर धावा केल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये तीन वर्षे खेळल्यानंतर त्याने न्यूझीलंड संघासाठी पदार्पण केले.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयने टी२० विश्वचषकाबाबत निर्णय घेण्यासाठी मागितला एक महिन्याचा अवधी, ‘हे’ आहे कारण
टी२० विश्वचषकापूर्वी रिकी पाँटिंगला आली एमएस धोनी, हार्दिक पंड्याची आठवण, का ते घ्या जाणून
कसोटी अजिंक्यपद फायनलसाठी आयसीसीची कठोर नियमावली, बायो बबलसह भारताला ‘हे’ नियम लागू