वर्ष 2023चा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळला जात आहे. न्यूझीलंडचा पुरुष संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला असून दुसरा सामना कराची येथे 2 जानेवारीपासून खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडच्या सलामीवीराने शतकी खेळी केली असून तो 2023चा पहिला शतकवीर ठरला आहे. त्याचबरोबर 2022चे पहिले आंतरराष्ट्रीय शतकही त्यानेच ठोकले होते.
कराचीमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये सलामीवीर डेवॉन कॉनवे (Devon Conway) आणि टॉम लॅथम (Tom Latham) यांनी संघाला चांगली सुरूवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 134 धावांची भागीदारी केली. लॅथम 71 धावा करत बाद झाला. तर कॉनवेने 156 चेंडूत शतक पूर्ण केले. हे त्याने कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक ठरले आहे. त्याने मीर हामजा याच्या गोलंदाजीवर सामन्याच्या 51व्या षटकाच्या पहिल्या चेंडूत 3 धावा घेत 100 धावांचा टप्पा गाठला. त्याच्या या शतकाबरोबर न्यूझीलंडच्या 200 धावाही पूर्ण झाल्या.
Devon Conway brings up his 4th Test ton.#WTC23 | 📝 https://t.co/5TMMWQ0jQl pic.twitter.com/NtpSAQ12ID
— ICC (@ICC) January 2, 2023
पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात कॉनवे पहिल्या डावात 122 धावा करत बाद झाला. त्याने ही खेळी 191 चेंडूत 16 चौकार आणि एक षटकार मारत केली. कॉनवेने 2022मध्येही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक केले होते. त्याने बांगलादेशविरुद्ध माउंट मॉन्गुई मैदानावर पहिल्या कसोटीमध्ये 1 जानेवारी, 2022ला शतक केले होते. त्या सामन्यातही त्याने 122 धावा केल्या होत्या. आता लागोपाठ दुसऱ्यांदा त्याने वर्षातील पहिले शतक ठोकण्याचा मान मिळवला आहे.
Devon Conway scored the first International hundred in 2022 & 2023.
He has been fantastic for New Zealand. pic.twitter.com/tlnZKCG3dj
— Johns. (@CricCrazyJohns) January 2, 2023
कॉवनेने 2021मध्ये कसोटी पदार्पण केले. त्याचा हा 12वा सामना असून त्याने आतापर्यंत 57.50च्या सरासरीने 1150 धावा केल्या आहेत. पाकिस्तान दौऱ्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. त्या सामन्यातही कॉनवेने 92 धावांची खेळी केली होती. या कसोटी मालिकेनंतर न्यूझीलंड पाकिस्तान विरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
(Devon Conway scored the first International hundred in 2022 & 2023 PAKvNZ Test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्याचा बीसीसीआयने केला अपमान तोच बनणार निवडकर्ता; ‘या’ नव्या नावांचीही चर्चा
व्यस्त वेळापत्रकामुळे किवी गोलंदाजाला आले टेंशन, भारत-पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेतून घेतली माघार