ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक सुरू आहे, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या युवा क्रिकेटपटूने त्याच्या उत्तम खेळीने 31 ऑक्टोबरचा दिवस गाजवला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा डेवाल्ड ब्रेविस याने टी20 क्रिकेटमध्ये विक्रमी खेळी केली. त्याने 57 चेंडूत 162 धावा केल्या. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक टी20 क्रिकेटमधील टायटन्स संघाकडून खेळताना नाईट्स विरोधात ही स्फोटक खेळी केली. यामध्ये त्याने 13 चौकार आणि 13 षटकार खेचले.
बेबी एबी नावाने प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेविस (Devald Brevis) याने अफगाणिस्तानच्या हजरतुल्लाह झझई आणि झिम्बाब्वेच्या हॅमिल्टन मसाकादजा यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तो आता टी20मधील सर्वाधिक मोठी धावसंख्या करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर 162 धावा आता दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याने केवळ 35 चेंडूत शतक केले. त्यानंतर 52 चेंडूत 150 धावांचा टप्पा गाठला. हे करताना तो सर्वात जलद दीडशतकी खेळी करणारा फलंदाज ठरला.
ब्रेविसच्याआधी क्रिस गेल याने 2013च्या आयपीएलमध्ये आरसीबी (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) कडून खेळताना 53 चेंडूत आणि ग्रॅहम नेपियर याने इसेक्सकडून खेळताना 2008मध्ये 57 चेंडूत दीडशतकी खेळी केली होती.
DEWALD BREVIS REMEMBER THE NAME
•5th fastest t20 hundred ever (35 balls)
•fastest Csa t20 100
•still not out 128(45)@InnoBystander @KP24 @ABdeVilliers17 @mipaltan @BrandonPortnoy @BigManBakar @TheCricketPanda @DanCricket93 pic.twitter.com/dTh47sQAm4— Ricci Goldstein (@epicric21) October 31, 2022
ब्रेविसच्या खेळीचे कौतुक एबी डिविलियर्स (AB de Villiers) यानेही केले. त्याने ट्वीट करत म्हटले, डेवाल्ड ब्रेविस, आता याच्यापुढे काही बोलायची आवश्यकता नाही.
Dewald Brevis. No need to say more
— AB de Villiers (@ABdeVilliers17) October 31, 2022
ब्रेविसच्या झंझावाती खेळीमुळे प्रथम फलंदाजी करताना टायटन्सने 3 विकेट्स गमावत 271 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना नाईट्स संघ 9 विकेट्स गमावत 230 धावांपर्यंत मजल मारू शकला.
ब्रेविसचे हे टी20च्या कारकिर्दीतील पहिले शतक आहे. त्याने 32 सामन्यात 809 धावा केल्या. त्यामध्ये त्याने 58 चौकार आणि 57 षटकार मारले आहेत. तो अजूनही मुंबईकडून संघात आहे. त्याने 7 सामन्यात 23च्या सरासरीने 161 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 14 चौकार आणि 11 षटकारांचा समावेश आहे.
RECORD BREAKER 🚨
Highest domestic T20 score ✔️
Fastest domestic century ✔️
3rd highest score of all time ✔️@BrevisDewald | 1⃣6⃣2⃣ runs | 5⃣7⃣ balls1⃣3⃣ fours
1⃣3⃣ sixes#CSAT20Challenge #BePartOfIt #SummerOfCricket pic.twitter.com/BonGpZ5L87— CSA Domestic Leagues (@DomesticCSA) October 31, 2022
टी20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक खेळी
175 – क्रिस गेल, आरसीबी वि. पुणे वॉरियर्स
172 – ऍरॉन फिंच, ऑस्ट्रेलिया वि. झिम्बाब्वे
162* – हॅमिल्टन मस्कादजा, मॉटेंनर्स वि. इगल्स
162* – हजरतुल्लाह झझई, अफगाणिस्तान वि. आयर्लंड
162 – डेवाल्ड ब्रेविस, टायटन्स वि. नाइट्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण
बूम बूम बुमराहचा पत्ता कट! टी20 विश्वचषकानंतर आता ‘या’ चार मालिकांनाही मुकणार