---Advertisement---

भारताचे असे ६ खेळाडू ज्यांच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीची सुरुवात टी२० विश्वचषकातून झाली

---Advertisement---

ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेचा थरार सुरू आहे. २००७ साली या स्पर्धेला प्रारंभ झाला होता. तेव्हापासून या स्पर्धेचे ७ पर्व पूर्ण झाले असून सध्या ८ वे पर्व सुरू आहे. या स्पर्धेच्या पहिल्याच पर्वाचे भारतीय संघाने जेतेपद मिळवले होते. तसेच स्पर्धेचे पहिले पर्व असल्यामुळे अनेक दिग्गज मंडळींनी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याच स्पर्धेतून पदार्पण देखील केले होते.

या लेखात आम्ही त्याच ६ भारतीय क्रिकेटपटूंबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीची सुरुवात टी२० विश्वचषक स्पर्धेतून केली होती.

१)प्रज्ञान ओझा – भारतीय संघातील डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याने क्रिकेटच्या तीनही स्वरूपात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्याला कसोटी क्रिकेटमध्ये अधिक यश मिळाले. तसेच प्रज्ञान ओझाने आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीची सुरुवात २००९ रोजी बांगलादेशमध्ये झालेल्या टी -२० विश्वचषक स्पर्धेतून केली होती. त्याने पदार्पणाच्या सामन्यात ४ षटके गोलंदाजी केली आणि २१ धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते.

२) विनय कुमार – भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज विनय कुमारने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अप्रतिम कामगिरी केली. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. त्याने २०१० मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यातून पदार्पण केले होते. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ३० धावा खर्च करत २ गडी बाद केले होते.

३) पियूष चावला – लेग स्पीन गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या पियूष चावलाने देखील २०१० मध्येच आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पदार्पण केले होते. तसेच पदार्पणाच्या सामन्यात त्याने २७ धावा देत १ गडी बाद केला होता.

४) मुरली विजय – मुरली विजय याने गेली अनेक वर्षे भारतीय संघासाठी डावाची सुरुवात केली. तसेच वनडे आणि टी२० सह कसोटी क्रिकेटमध्ये देखील त्याने आपला ठसा उमटवला होता. मुरली विजयला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी २०१० मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत मिळाली होती.अफगानिस्तान संघाविरुद्ध झालेल्या पहिल्याच सामन्यात त्याने ४६ चेंडूंमध्ये ४८ धावांची खेळी केली होती.

५) मोहम्मद शमी – भारतीय संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजांपैकी एक मोहम्मद शमीने देखील आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीची सुरुवात टी२० विश्वचषक स्पर्धेतून केली होती.त्याला २०१४ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३१ धावा खर्च करत १ गडी बाद केला होता.

६) मोहित शर्मा – आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर मोहित शर्माची भारतीय संघात निवड करण्यात आली होती. २०१४ मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेत मोहित शर्माला आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली गेली होती. ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने जबरदस्त कामगिरी करत अवघ्या ११ धावा खर्च केल्या होत्या आणि शेन वॉटसनला बाद केले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: बेबी एबीची कमाल! 57 चेंडूत ठोकल्या 162 धावा
ऑस्ट्रेलिया आख्ख्या जगाला नडायचे आणि ऑस्ट्रेलियाला नडायचा एकटा व्हीव्हीएस लक्ष्मण

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---