सध्या वेस्ट इंडिज संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे.या मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात श्रीलंका संघाने पहिल्या डावात अप्रतिम फलंदाजी करत वेस्ट इंडिज संघासमोर धावांचा डोंगर उभारला होता. तर याच संघातील फलंदाज धनंजय डी सिल्वा आगळ्या वेगळ्या पद्धतीने बाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
धनंजय डी सिल्वा चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत होते. त्यानंतर डावातील ९५ वे षटक टाकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाकडून शॅनन गेब्रियल गोलंदाजीला आला होता. गेब्रियलने टाकलेल्या चेंडूवर धनंजय डी सिल्वाने रक्षात्मक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्न फसला आणि चेंडू बॅटच्या कडेला लागला. त्यानंतर तो चेंडू यष्टीच्या दिशेने जात असताना धनंजय डी सिल्वाने बॅटने एक नव्हे, तर दोन वेळेस चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो अपयशी ठरला आणि तो या प्रयत्नात हिटविकेट होऊन माघारी परतला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
Very unlucky , very very unlucky Dhananjaya De Silva .. One of the rarest things you will get to see in cricket – Hit wicket .. Most unluckiest dismissal for a batsman #WIvSL pic.twitter.com/rFQQMGcRv9
— 🅒🅡🅘︎🅒︎🄲🅁🄰🅉🅈𝗠𝗥𝗜𝗚𝗨™ 🇮🇳❤️ (@MSDianMrigu) November 23, 2021
धनंजय डी सिल्वाने या सामन्यातील पहिल्या डावात ६१ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. तसेच २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात देखील धनंजय डी सिल्वा मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर हिटविकेट झाला होता. तो कसोटी क्रिकेटमध्ये दोन वेळेस हिटविकेट होणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी रोमेश कालूविर्तणा १९४७ मध्ये २ वेळेस हिटविकेट झाले होते.
https://twitter.com/Manirat_18/status/1462647809908170759?t=o32PsXzy6U4smKPjf5x9_Q&s=08
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंका संघाकडून कर्णधार करूनारत्नेने सर्वाधिक १४७ धावांची खेळी केली. तर धनंजय डी सिल्वाने ६१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर श्रीलंका संघाला पहिल्या डावात ३८६ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाकडून कर्णधार कार्लोस ब्रेथवेटने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली. वेस्ट इंडिज संघाला दुसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात ६ बाद ११३ धावा करण्यात यश आले.
महत्त्वाच्या बातम्या –
अवघ्या ७ मिनीटात गॅरी कर्स्टन झाले होते टीम इंडियाचे कोच, पाहा कसे
जेव्हा गॅरी कर्स्टनसाठी धोनीने रद्द केली होती टीम इंडियाची ट्रीप