सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका लहान मुलाने शाळेत ‘बचपन का प्यार मेरा भुल नहीं जाना रे’ हे गाणं म्हटले आहे. हे गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या गाण्याने सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सर्वांना वेड लावले आहे. यामध्ये भारतीय संघाचा फिरकीपटू यूजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माचा देखील समावेश आहे.
धनश्री देखील या गाण्याच्या रंगात रंगली आहे. मागील काही दिवसांपासून धनश्री वर्माने एकही डान्सचा व्हिडीओ शेअर केला नव्हता. पण ‘बचपन का प्यार’ हे गाणं ऐकल्यानंतर तिला पुन्हा एकदा डान्स करावेसे वाटले. त्यामुळे तिने आता या गाण्यावर डान्स व्हिडिओ केला आहे.
अपारशक्ती खुराना झाला डान्स पार्टनर
प्रसिद्ध आरजे आणि बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना धनश्री वर्माचा डान्स पार्टनर झाला आहे. या दोघांनी गाण्यात थोडा पंजाबी डान्सचा तडका देखील दिला आहे. चाहते हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात लाईक करत आहेत आणि शेअर देखील करत आहेत.
https://www.instagram.com/reel/CR-sKwaIGCY/?utm_source=ig_web_button_share_sheet
सहदेवने हे गाणे गायले
हे गाणे ‘बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना’ छत्तीसगड येथील एका मुलगा सहदेव कुमार दिरदो याने गायले होते. जे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक बादशाह सोबतही तो लवकरच गाणे गाणार आहे. ज्यासाठी सहदेवला बादशहाने चंदीगडला बोलावले आहे.
धनश्री वर्माबद्दल थोडी माहिती
भारतीय फिरकीपटू चहलची पत्नी धनश्री वर्मा ही एक प्रोफेशनल डान्सर आहे. त्याचबरोबर ती एक कोरियोग्राफर आहे आणि तिचे यूट्यूब चॅनल देखील आहे. ती आपले डान्सचे व्हिडिओ नेहमी सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्याच बरोबर ती एक दांतचिकित्सक देखील आहे. तिचे शिक्षण डी वाय पाटील इथून झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलप्रेमींसाठी मोठी खुशखबर, उर्वरित हंगामासाठी उपलब्ध राहणार ‘या’ देशाचे खेळाडू
विक्रमवीर बाबर आजम! वेस्ट इंडिजविरुद्ध झुंजार अर्धशतक झळकावत विराट-रोहितवरही ठरला वरचढ
‘या’ धुरंधरावर सीएसकेचे लक्ष! तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये अवघ्या ५ सामन्यात चोपल्यात २९६ धावा