---Advertisement---

‘जर्सी पेहेनके गेम दिखा’, धनश्रीचा भारताच्या जर्सीतील डान्स पाहून टी२० विश्वचषकात दुर्लक्षित राहिलेला चहल भावुक

On: शुक्रवार, ऑक्टोबर 22, 2021 3:12 PM
---Advertisement---

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला १७ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. तसेच भारतीय संघाची पहिली लढत २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला संधी देण्यात आली नाहीये. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती, तरीही संघ व्यवस्थापनाने त्याच्या नावाचा विचार केल्याचे दिसत नाहीये. अशातच युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. या फॉलोवर्ससोबत जोडून राहण्यासाठी ती नेहमी फोटो आणि डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. धनश्री वर्मा ही प्रोफेशनल डान्सर आहे. नुकताच तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती भारतीय संघाची जर्सी घालून डान्स करताना दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ती भारतीय संघाची जर्सी घालून ‘वे घुमाके गेम दिखा..’ या गाण्यावर डान्स करताना दिसून येत आहे. या व्हिडिओवर चाहते आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहे. तसेच युझवेंद्र चहलने देखील या व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने काही लिहिले नाही, परंतु त्याने तिरंगा आणि हार्टच्या ईमोजीद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

https://www.instagram.com/reel/CVQJHnsIvOJ/?utm_source=ig_web_button_share_sheet

यापूर्वी देखील धनश्री वर्माने एक भावूक करणारी पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले होते की, “आई म्हणते की… हा वेळ देखील निघून जाईल. मान उंच करून जगा कारण कौशल्य आणि चांगली कृत्य नेहमी साथ देत असतात. तर गोष्ट अशी आहे की, ही वेळ देखील निघून जाईल. देव महान आहे.”

महत्त्वाच्या बातम्या-

कसं काय पुणे? भारतीय क्रिकेटर विराट कोहली पुण्यात सुरू करतोय ‘रेस्टो-बार’

आयपीएल २०२१ मध्ये होता ‘या’ ५ खेळाडूंचा बोलबाला, आता टी२० विश्वचषकातील कामगिरीवर असेल सर्वांचे लक्ष

‘या’ ३ संघांची सुपर १२ फेरीत दिमाखात एन्ट्री, आयर्लंड वि. नामबिया सामन्यावर निर्भर असेल चौथी टीम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---