---Advertisement---

युझवेंद्र चहलच्या पत्नीने केली धोनीच्या ‘हेलीकॉप्टर’ शॉटची नक्कल, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

On: शुक्रवार, डिसेंबर 10, 2021 12:10 PM
Dhanashree-Verma
---Advertisement---

भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा ही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असते. युझवेंद्र चहल क्रिकेटच्या मैदानावर दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवतो, तर धनश्री वर्मा ही कोरियोग्राफर असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी तिच्या तालावर नाचत असतात. कोरियोग्राफर असल्यामुळे ती आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. नुकताच तिने एक हटके व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

धनश्री वर्मा आपल्या डान्सने सोशल मीडियावर आग लावत असते. परंतु, यावेळी ती डान्स नव्हे, तर बॅटने शॉट मारताना दिसून येत आहे. धनश्री वर्माचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीचा ठरतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये धनश्री वर्माच्या हातात एक बॅट असून ती हटके शॉट खेळताना दिसून येत आहे. हे शॉट खेळताना तिने चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार एमएस धोनीचा प्रसिद्ध शॉट ‘हेलीकॉप्टर’ शॉटची नक्कल केली आहे. यासह ती स्क्वेयर कट, स्ट्रेट ड्राइव, हुक शॉट, स्वीप शॉट देखील खेळताना दिसून येत आहे. या व्हिडिओवर कॅप्शन देत तिने, “खेळ सहनशक्तीचा आहे आणि मुलं किंवा मुलींचा नाही.”

https://www.instagram.com/reel/CXQLzTRour8/?utm_medium=copy_link

काही दिवसांपूर्वी तिचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिच्या क्रोरियोग्राफीवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील दिग्गज खेळाडू विराट कोहली, एबी डीविलियर्स, युझवेंद्र चहल, ग्लेन मॅक्सवेल आणि देवदत्त पडीक्कल डान्स करताना दिसून आले होते.

या व्हिडिओमध्ये तिने हटके कोरियोग्राफी केली होती. सर्व खेळाडू उत्साहात डान्स करताना दिसून आले होते. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आपल्या सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंचे आभार मानण्यासाठी या व्हिडिओची निर्मिती केली होती. भविष्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील खेळाडू या स्पर्धेत कसे पुढे जातील याची झलकही या व्हिडिओ पाहायला मिळते.

महत्वाच्या बातम्या :

कसोटीत एका डावात १० विकेट्स घेणारा एजाज आयपीएल खेळण्याबाबत म्हणाला असं काही, वाचा

मातब्बर गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकमधून बाहेर झाली विराटची पत्नी अनुष्का शर्मा, पण का?

दक्षिण आफ्रिका आहे भारताचा ‘फायनल फ्रंटियर’, त्यांच्याच मायभूमीत त्यांना धूळ चारत ‘विराटसेना’ घडवणार इतिहास!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---