---Advertisement---

‘स्पिनर आणि स्किपरसह!’ धनश्री वर्माने शेअर केला फ्लॅशबॅक फोटो

On: शनिवार, मे 22, 2021 10:45 PM
---Advertisement---

भारताचा लेगस्पिनर युझवेंद्र चहलने काही महिन्यांपूर्वीच लग्नगाठ बांधली होती. त्याने पेशाने युट्यूबर आणि डान्सर असलेल्या धनश्री वर्माशी लग्न केले होते. धनश्री सोशल मिडीयावर नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे वेगवेगळे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे, ज्याला आता चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते आहे. धनश्रीने शेअर केलेल्या या फोटोत तिच्यासह भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली आणि युझवेंद्र चहल दिसून येत आहेत.

हटके कॅप्शनसह शेअर केला फोटो
धनश्री नेहमीच सोशल मिडीयावर काही ना काही कारणाने चर्चेत असते. चहल आणि तिच्या आयुष्यातील काही खास क्षण ती तिच्या अकाउंटवरून चाहत्यांसाठी शेअर करत असते. आत्ताही तिने असाच एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती पती युझवेंद्र चहल आणि विराट कोहलीसह दिसून येते आहे. हा फोटो आयपीएल दरम्यानचा असल्याचे लक्षात येते आहे.

‘आपल्या स्पिनर आणि स्किपर (कर्णधार) सह’ अशी ओळ या फोटो खाली धनश्रीने लिहिले आहे. कॅप्शन मध्ये तिने ‘नाश्त्याच्या वेळच्या मजेदार संभाषणांसह सामन्यानंतरच्या गमती-जमतीं पर्यंत, सगळेच अतिशय छान होते. आणि ज्ञानाचे व माहितीचे आदानप्रदान करणारे होते’, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आरसीबीचे आणि इतरही चाहते या पोस्टवर कमेंटचा आता वर्षाव करत आहेत.

https://www.instagram.com/p/CPKhNGlFHRS/?utm_source=ig_web_copy_link

धनश्री सोशल मिडीयावर असते चर्चेत
काही दिवसांपूर्वी धनश्रीने सोशल मिडीयावर एक व्हिडिओ टाकला होता, ज्यात ती आरसीबीची जर्सी घालून डान्स करतांना दिसून आली होती. हा व्हिडिओ देखील चाहत्यांना अतिशय पसंत पडला होता. या व्हिडिओवर जवळपास पाच लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते. धनश्री नेहमीच असे वेगवेगळे व्हिडिओ टाकत असते, ज्यामुळे सोशल मिडीयावर तिची नेहेमीच चर्चा होत असते.

महत्त्वाच्या बातम्या – 

“हे तुमच्याच बॉसविरुद्ध गोल्फ खेळण्यासारखे”, कसोटी अजिंक्यपदाच्या फायनलपूर्वी दिग्गजाचा न्यूझीलंडला सावधगिरीचा इशारा

असे ३ भारतीय खेळाडू ज्यांना कधीही मिळू शकणार नाही टीम इंडियाचे कर्णधारपद

विस्डेनने निवडला सर्वकालीन भारतीय कसोटी संघ; सेहवाग-धोनीला डच्चू, तर ‘हा’ खेळाडू असेल कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---