---Advertisement---

उर्वरित आयपीएल २०२१ ची जोरदार तयारी! धोनी, रैनाचा कसून सराव, नेट्समध्ये खेळले अस्मानी शॉट्स

On: मंगळवार, ऑगस्ट 24, 2021 5:00 PM
---Advertisement---

इंडीयन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सचा संघ दुबईमध्ये पोहचला असून सरावालाही सुरुवात केली आहे. चेन्नई सुपर किंग्जचे स्टार खेळाडू यावेळी कोणतीही कसर सोडण्याच्या मूडमध्ये दिसून येत नाहीत. सोमवारी (२३ ऑगस्ट) कर्णधार एमएस धोनी आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैना यांनी जोरदार सराव केला, त्यांचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

पहिला सामना मुंबईविरुद्ध
संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्यांदा पोहोचलेल्या संघांच्या यादीत चेन्नई सुपर किंग्जचा समावेश आहे. त्यांचा आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला सामना १९ सप्टेंबरला यूएईमध्ये ५ वेळच्या विजेच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे.

सीएसकेने आपल्या ट्विटर हँडलवर नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात एमएस धोनी, सुरेश रैना आणि अंबाती रायडू जबरदस्त सराव करताना दिसले. या दिग्गजांनी नेटमध्ये काही जबरदस्त शॉट्स मारले. या शॉट्सचे चाहते प्रचंड कौतुक करत आहेत.

धोनी, रैनासमोर चांगल्या कामगिरीचे आव्हान
एमएस धोनी आणि सुरेश रैना आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यात काही विशेष करू शकले नाहीत. आता त्यांचा प्रयत्न यूएईमध्ये जबरदस्त पुनरागमन करण्याचा आणि सीएसके संघाला पुन्हा एकदा विजेतेपद मिळवून देण्याचा आहे. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या कामगिरीवर सर्वांची नजर राहाणार आहे.

चेन्नई सुपर किंग्स टॉप 2 मध्ये
सध्या, आयपीएल २०२१ च्या गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नईने पहिल्या टप्प्यात ७ पैकी ५ सामने जिंकून १० गुण मिळवले आहेत. तसेच दिल्ली कॅपिटल्स १२ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

तिसऱ्या कसोटीचे ५ दिवस कसे असेल हेडिंग्लेचे हवामान? जाणून घ्या पावसाची किती असेल शक्यता?

“फक्त ३ डावांनंतर महान फलंदाजावर शंका घेणे चुकीचे”, विराट कोहलीला माजी भारतीय क्रिकेटरचा पाठिंबा

आजच्याच दिवशी वाडेकरांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंड भूमीवर रचलेला इतिहास

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---