---Advertisement---

सीएसकेच्या प्रशिक्षण सत्रात धोनी दिसला नव्या भूमिकेत, दीपक चाहरने जिंकला मजेदार गेम

---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या सत्राच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नई सुपर किंग्सचा (सीएसके) संघ आपली ताकद दाखवण्यासाठी जोरदार तयारी करतोय. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेने दुबईत प्रशिक्षण सुरू केले आहे. दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात संघाला पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागेल. दरम्यान, सीएसके संघाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये फिरकीपटू कर्ण शर्मा आणि दीपक चाहर यांच्यात एक मजेदार फुटबॉल सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान संघाचा कर्णधार धोनी एका नव्या भूमिकेत दिसत आहे. व्हिडिओमध्ये धोनी खेळाच्या नियमांची चर्चा करताना तसेच कर्ण शर्माला मार्गदर्शनही करताना दिसतोय.

खेळला गेला अनोखा फुटबॉल सामना
सीएसकेने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये कर्ण शर्मा आणि दीपक चाहर यांच्यात अनोखा फुटबॉल सामना खेळला गेला. केवळ दोन वेळा चेंडूला स्पर्श करून तो दुसऱ्या खेळाडूकडे पाठवावा असा साधा नियम या खेळाचा होता. ज्यामध्ये दीपकने पहिले ७ गुण मिळवून विजय मिळवला. या आगळ्यावेगळ्या सामन्यासाठी धोनी दोन्ही खेळाडूंना सामन्याचे नियम सांगताना दिसून आला. त्याचबरोबर धोनी कर्णला एका प्रसंगी हेडर मारण्याचा सल्ला देताना दिसत आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये धोनी खूप मस्त आणि मजा करताना दिसतोय. दीपक चाहर सामना जिंकल्यानंतर खूप आनंदी दिसत आहे.

पहिल्या टप्प्यात केली दमदार कामगिरी
कोरोना प्रादुर्भावामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यापूर्वी सीएसकेने कामगिरी उत्कृष्ट होती. संघाने ७ पैकी ५ सामने जिंकले तर संघाला दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. वेगवान गोलंदाज जोस हेजलवूड आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईसाठी उपलब्ध असेल. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे हेजलवूडने पहिल्या टप्प्यातून माघार घेतलेली. त्याच्या जागी जेसन बेहरनडोर्फला संघात समाविष्ट करण्यात आलेले. संघाचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिस यांनी या हंगामात त्यांच्या फलंदाजीने प्रभावित केले आहे. त्याचबरोबर दीपक चाहरने गोलंदाजीत संघाकडून दमदार कामगिरी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

माजी कर्णधार बनणार पाकिस्‍तान क्रिकेट बोर्डाचा अध्यक्ष? पंतप्रधान घेणार अंतिम निर्णय

केविन पीटरसनने मोईन अलीले नाव घेत तिसऱ्या कसोटीबद्दल केली भविष्यावाणी; म्हणाला…

अबब! ब्रॅडमन यांच्या ‘बॅगी ग्रीन’ला मिळाली ‘इतकी’ किंमत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---