भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे, यामध्ये तिळमात्र शंका नाही. धोनीच्या खेळावर त्याच्या वाढत्या वयाचा परिणाम झाला आहे. परंतु देशासाठी खेळण्याची त्याची आवड आणि उत्साह अजूनही त्याच्यामध्ये पहायला मिळतो.
वनडे विश्वचषक २०१९मधील उपांत्य सामन्यात धोनी बाद झाल्यानंतर भारतीय संघाचे विश्वचषकाचे स्वप्न स्वप्नच राहिले. त्यानंतर ८ महिने झाले भारतीय संघाकडून धोनी एकही सामना खेळला नाही.
आयपीएल २०२०च्या १३ व्या हंगामामधून धोनी क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करू शकतो. पंरतु सध्या हाहाकार माजवत असलेला कोरोना व्हायरसमुळे आयपीएल १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. त्यामुळे धोनी भारतीय संघात पुनरागमन करेल की निवृत्ती घेईल याबद्दल खुलासा करण्यात आला आहे.
धोनीच्या रांचीतील मित्राने एका टी.व्ही. चॅनेलशी बोलताना सांगितले की, धोनी सध्या निवृत्तीबद्दल विचार करत नाही. त्याला भारतीय संघाकडून अजून खेळायचे आहे.
धोनीचा मित्र पुढे म्हणाला की, जेव्हा कोणीही धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा करतात तेव्हा त्याला राग येतो. धोनी मागील काही महिन्यांपासून खूप सराव करत आहे. त्याला माहिती आहे की तो आता युवा राहिला नाही.
त्यामुळे त्याला या वयात जे काही करण्याची गरज तो ते सर्व करत आहे. तसेच स्वत:ला फीट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. धोनीचे उद्दिष्ट हे आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणे असून भारतीय संघात पुनरागमन करण्यावर त्याचे संपूर्ण लक्ष्य आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
गोष्ट एका क्रिकेटरची भाग १३: तब्बल १८ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा आशिष नेहरा
ज्या संघाचं नाव घेतलं तरी गंभीरला यायचा राग, तेच करताय आता गंभीरचं कौतूक
या ५ खेळाडूंना आहे कसोटीत १० हजार धावा करण्याची संधी, एक नाव आहे भारतीय