मुंबई। रविवारी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद सामन्यात चेन्नईने हैद्राबादवर ८ विकेट्सने विजय मिळवला. याबरोबर कर्णधार एमएस धोनीने एक खास विक्रम केला आहे.
हा विजय कॅप्टन कूल धोनीचा टी२० मधील कर्णधार म्हणून १५० वा विजय होता. टी२०मध्ये धोनी सोडून कोणत्याही कर्णधाराला १०० सामनेही जिंकता आले नाही.
दोन आठवड्यांपुर्वी चेन्नई सुपर किंगमधील धोनीनंतरचा महत्त्वाचा खेळाडू असलेल्या सुरेश रैनाने धोनीची खास स्तुती केली होती. तसेच आम्हाला आयपीएल २०१८ धोनीसाठी जिंकायची आहे असेही तो म्हणाला होता.
“धोनी खुप भावनिक आहे. तो चेन्नई सुपर किंग्जबद्दल खुप काळजी करतो. आम्ही सगळेच अशी काळजी करतो. २००८पासुन तो या संघाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे आम्हाला यावेळी ही स्पर्धा त्याच्यासाठी जिंकायची आहे.” असे रैना म्हणाला होता.
काल आयपीएलचे विजेतेपद तिसऱ्यांदा जिंकुन त्यांनी हे खरे करुन दाखवले.
सुरेश रैनाने या आयपीएलमध्ये १५ सामन्यात ४४५ धावा केल्या. तो चेन्नईकडून या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी राहिला.
महत्त्वाच्या बातम्या-
–सलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू
–म्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन
–जेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप झाली पक्की
-सचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला
–लाॅर्ड्स कसोटी पाकिस्तानने जिंकली, इंग्लंडविरुद्ध मालिकेत १-० आघाडी