आयपीएलचा १४ वा हंगाम विना प्रेक्षक आणि बंद दाराआड खेळला जात आहे. स्पर्धेतील सामने अत्यंत अटीतटीचे होत आहेत. आयपीएल ही एक स्पर्धा आहे ज्यात दरवर्षी नवीन प्रतिभा समोर येते. आता पंजाब किंग्सकडून खेळणारा तमिळनाडूचा शाहरुख खान आजकाल त्याच्या खेळामुळे चर्चेचा विषय ठरला आहे.
धोनी आणि शाहरुखची झाली भेट
पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबला पराभव पत्करावा लागला असला तरी, युवा फलंदाज शाहरुख खानच्या फलंदाजीने सर्वांना चकित केले. आक्रमक फलंदाजीसाठी परिचित शाहरुख खान हा उजवा हाताचा फलंदाज सामना संपल्यानंतर बराच वेळ चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीशी बोलताना आणि त्याच्याकडून क्रिकेटच्या युक्त्या शिकताना दिसला.
धोनीशी झालेल्या चर्चेबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला, “माही भाईने मला सामना फिनिश करण्याविषयी सांगितले. दबावातून सामना जिंकणेविषयी त्याने मला सल्ला दिला. संघात माझी भूमिका लोअर ऑर्डर फिनीशरची आहे. मात्र, मैदानात येताच जोरदार फटकेबाजी नेहमी करता येत नाही. खेळाची स्थिती पाहून काळजीपूर्वक फटकेबाजी करावी लागते.”
जगातील सर्वोत्तम फिनिशर मानला जाणारा धोनी नेहमी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसतो. यापूर्वी देखील रियान पराग, पृथ्वी शॉ, आवेश खान यांना त्याने काही टिप्स दिल्या होत्या.
शाहरुखची एकाकी झुंज
हंगामातील आपला दुसरा सामना खेळणाऱ्या शाहरुखने चेन्नई विरुद्ध पंजाबसाठी एकाकी झुंज दिली. पहिले पाच फलंदाज केवळ २६ धावात परतल्यानंतर त्याने डावाची जबाबदारी स्वीकारली. अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी शाहरुखने ३६ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ४७ धावा बनविल्या. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील चमकदार कामगिरीमुळे त्याला आयपीएल लिलावात ५ कोटी रुपयांच्या किमतीत पंजाबने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
गोलमाल है भाई, सब गोलमाल है! नटराजनला संघाबाहेर ठेवण्याबाबत मूडी आणि लक्ष्मणचे वेगवेगळे विधान
राजस्थान संघाने बेन स्टोक्सला दिला भावनिक निरोप, दिली अशी की त्याला झाली वडिलांची आठवण, पाहा व्हिडिओ
मला आशा नव्हती की इतक्या लांबून हिट लागेल; ‘त्या’ रनआऊटबद्दल हार्दिक पंड्याचे भाष्य