रविवारी पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब सामन्यात चेन्नईचा कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीने शानदार कामगिरी करताना ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला.
त्याने या सामन्यात 3 झेल घेतले. त्यामुळे त्याने ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक झेल आणि सर्वाधिक विकेट घेण्याचा मोठा पराक्रम केला आहे.
धोनीने आत्तापर्यंत ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये यष्टीमागे एकूण 216 विकेट घेतल्या आहेत यात 143 झेलांचा समावेश आहे.
यष्टीमागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम करताना त्याने श्रीलंकेच्या कुमार संरकाराच्या 142 झेलांना मागे टाकले तर यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेण्याच्या विक्रमात धोनीने पाकिस्तानच्या कमरान अकमलला मागे टाकले आहे.
यष्टीमागे सर्वाधिक झेल घेण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर भारताचाच दिनेश कार्तिक आहे.
ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक झेल घेणारे यष्टीरक्षक:
143 झेल – एमएस धोनी
142 झेल – कुमार संगकारा
139 झेल – दिनेश कार्तिक
ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक विकेट घेणारे यष्टीरक्षक:
216 – एमएस धोनी
215- कमरान अकमल
202- कुमार संगकारा
महत्त्वाच्या बातम्या-
–तब्बल ११ आयपीएल वाट पहावे लागले आणि अखेर काल तो विक्रम घडलाच!
–व्हिडिओ व्हायरल- मुंबई हारली, पंजाब संघाची मालकीण प्रीती झिंटा खुष
–कोण आहे रोहित शर्मा? शेजारी बसलेल्या प्रवाशाने रोहितला पाहताच काय केले पहा?
–रैनाच आहे आयपीएल विक्रमांचा बादशाह, रोहितचा विक्रम दोन दिवसात मोडला
–फक्त या कारणामुळे झाला मुंबई इंडियन्सचा पराभव?
–असा विचित्र योगायोग आयपीएलमध्ये पुर्वी कधीच झालाच नाही!
–टाॅप ७- या खेळाडूंनी केल्या आहेत आयपीएलमध्ये ४००० धावा