रांची | भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षी धोनीने बंदूक परवाना मिळण्यासाठी रांची जिल्हा अधिकारी कार्यालयात अर्ज केला आहे.
या अर्जात साक्षी धोनीने तिच्या वैय्यक्तिक सुरक्षतेसाठी पिस्तूल किंवा 0.32 बोअरची रिवॉल्वर खरेदी करण्यासाठी परवाना मिळावा असे म्हठले आहे.
साक्षी धोनीच्या म्हणण्याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी जास्तीत जास्त वेळ भारतीय संघाबरोबर असल्यामुळे ती घरात एकटीच असते. त्याचबरोबर घराबाहेर जाताना तिला एकटीलाच जावे लागते. यामुळे तिला कायम भिती वा़टते.
धोनीच्या घरी कायम अत्याधुनिक शस्त्रांसह सात सुरक्षारक्षक तैनात असतात. तसेच ती बाहेर जाताना काही सुरक्षारक्षक तिच्यासोबत असतात. असे असुनही धोनीच्या पत्नीने पिस्तूल खरेदी करण्यासाठी व ती बाळगण्यासाठी परवाना मागितला आहे.
यापूर्वी 2008 साली धोनीली अज्ञात व्यक्तीने 50 लाखांची खंडणी होती. या कारणामुळे धोनीने अर्ज केल्यानंतर त्यालाही 2010 साली शस्त्र परवाना मिळाला आहे.
3 जुलैपासून इंग्लंड दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय एकदिवसीय आणि टी-20 संघात महेंद्रसिंग धोनीचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वनडे कारकिर्दीत सर्व शतके ९९ पेक्षा कमी चेंडूत करणारे ३ खेळाडू!
-४८१ धावा तर केल्या; परंतु अजून १६ धावा केल्या असत्या तर इतिहास घडला असता!