सोशल मीडियावर नेहमीच क्रिकेटचे हटके व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असतात. क्रिकेटच्या मैदानावर एखादया फलंदाजाने हटके शॉट मारला, क्षेत्ररक्षकाने हटके झेल टिपला किंवा काही मजेशीर प्रसंग घडला. हे व्हिडिओ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. परंतु, सध्या एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. जो यापूर्वी तुम्ही क्वचितच पाहीला असेल.
क्रिकेट खेळताना खेळाडू जर्सी आणि ट्रॅक पँट घालून मैदानात येत असतात. परंतु, तुम्ही कधी खेळाडूंना धोती आणि कुर्ता घालून क्रिकेट खेळताना पाहिलं आहे का? परंतु, असा प्रकार घडला आहे तो मध्यप्रदेशमध्ये. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक आगळ्या वेगळ्या प्रकारची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये खेळाडू धोती आणि कुर्ता घालून क्रिकेट खेळताना दिसून आले होते. तसेच या स्पर्धेचे समालोचन संस्कृत भाषेत करण्यात आले. या ३ दिवसीय स्पर्धेचे आयोजन महर्षी वैदिक कुटुंबाने केले होते. (players playing Cricket by wearing dhoti)
भोपाळमध्ये सुरू असलेली ही स्पर्धा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या स्पर्धेत प्रत्येक सामन्याची सुरुवात वैदिक मंत्रोच्चाराने होत आहे. तसेच विधी करणारे ब्राह्मण, खेळाडू म्हणून या स्पर्धेत सहभाग घेत आहेत. या उप्रकमाचे मुख्य धैय्य संस्कृत भाषेचा प्रसार करणे आहे. यासह या सामन्यांच्या माध्यमातून वैदिक कर्मकांडात सहभागी असलेले ब्राह्मणही खेळापासून दूर नाहीत, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Madhya Pradesh: Players wore dhoti & mundu and the commentary was done in the Sanskrit language during a cricket match organised by Maharishi Vedic Parivar in Bhopal on Monday
"This initiative is aimed at promoting the Sanskrit language," said a player pic.twitter.com/gR5d9wiNGC
— ANI (@ANI) January 18, 2022
या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंच्या माथ्यावर त्रिपुंड होते. तर गळ्यात रुद्राक्षाची माळ होती. ही स्पर्धा वेगळी वाटत असली तरीदेखील खेळाडूंमध्ये विजय मिळवण्यासाठी जोरदार जल्लोष पाहायला मिळत होता. तसेच या संपूर्ण स्पर्धेचे समालोचन संस्कृत भाषेत करण्यात आले होते. यापूर्वी देखील अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल २०२२: अहमदाबादने निवडली आपली ‘त्रिमूर्ती’; हार्दिक-राशिदसह ‘या’ युवा फलंदाजावर लावला दाव
बुमराहसोबतच्या ‘हायव्होल्टेज’ वादानंतर आली जेन्सनची प्रतिक्रिया; म्हणाला…
हे नक्की पाहा: