भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने भारतीय संघातील त्याच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबर पहिल्यांदा झालेल्या भेटीबद्दलही सांगितले आहे. युवराजने सन २००० मध्ये आयसीसी नॉकआऊट ट्रॉफीमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याआधी तो १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता.
नेटफ्लिक्सवर ‘स्टोरीज बिहाइंड स्टोरीज’ या नावाने अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये युवराज बोलताना दिसत आहे. यात त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने सांगितले की ‘सन २००० मध्ये मी भारतीय संघाकडून पदार्पण केले. मी १९ वर्षांखालील विश्वचषक खेळल्यानंतर त्याच फ्लोमध्ये पुढे गेलो. अचानक मला माझ्या आदर्श खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळाली होती. तेंडुलकर, गांगुली, द्रविड, अनिक कुंबळे, श्रीनाथ- असे मोठे खेळाडू संघात होते. मला तेव्हा असे वाटले की मी कुठे आलो आहे.’
सचिनबरोबरची आठवण सांगताना युवराज म्हणाला, ‘मी माझ्या वर्गातही मागे बसायचो आणि बसमध्येही. त्यावेळी सचिन बसमध्ये आला आणि त्याने माझ्याशी, झहिर खानशी आणि विजय दहियाशी हस्तोंदलन केले. मला आठवते, त्यानंतर जेव्हा तो मागे वळाला आणि त्याच्या जागेवर जाऊन बसला, तेव्हा मी माझे हात माझ्या संपूर्ण शरिरावर फिरवले होते. तेव्हा मी सचिनबरोबर हात मिळवला होता, म्हणून मला अंघोळही करायची इच्छा नव्हती.’
याबरोबरच युवराजने सांगितले की कारकिर्दीच्या प्रत्येक टप्प्यावर त्याला सचिनचे मार्गदर्शन मिळाले. जेव्हाही तो खराब फॉर्ममध्ये होता तेव्हा सचिनने त्याला धीर दिला होता. याबरोबरच युवराजने सांगितले की भारतीय संघाला २०११ चा विश्वचषक जिंकून सचिनला सर्वात चांगली भेट द्यायची होती.
महत्त्वाच्या बातम्या –
“धोनी आयपीएल २०२१ ला चेन्नईचे कर्णधारपद सोडेल”, या दिग्गजाचे मोठे वक्तव्य
राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी गरीब मुलांबरोबर लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद ;पाहा व्हिडिओ
विराट..फक्त नावच पुरेसं आहे! कोहली खेळणार असलेल्या एकमेव कसोटीच्या तिकिटांच्या मागणीत वाढ
ट्रेंडिंग लेख –
भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
करियरच्या अखेरच्या चेंडूवर विकेट घेणारे ५ गोलंदाज, ऍडम गिलख्रिस्टनेही केला आहे हा कारनामा