---Advertisement---

मॅराडोना यांचा मृत्यू नैसर्गिक नव्हेतर हत्या? जवळच्या लोकांवर संशय

On: शुक्रवार, मे 21, 2021 7:46 PM
---Advertisement---

फुटबॉल विश्वातील सर्वकालीन महान फुटबॉलर दिएगो मॅराडोना यांच्या निधनाला अजून सहा महिने देखील झाले नाहीत. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांचे निधन झाले होते. त्याचवेळी आता, मॅराडोना यांच्या मृत्यूविषयी एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. मॅराडोना यांचा मृत्यू नैसर्गिक नसून ही हत्या असल्याचा दावा केला जात असून, त्यांच्या हत्येचा आरोप ७ जणांवर ठेवला आहे.

मॅराडोना यांच्या मृत्यूविषयी खळबळजनक खुलासा
फुटबॉल विश्वातील आदरणीय नाव असलेल्या दिएगो मॅराडोना यांचे वयाच्या ६० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. आता, याविषयी एक मोठी माहिती समोर आली असून त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

कायदेशीर दस्तावेज व टीएन टेलिव्हिजन स्टेशन यांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, दिएगो मॅराडोना यांचे खासगी डॉक्‍टर लिओपोल्ड ल्यूक, मनोवैज्ञानिक ऑगस्टीना कोसाचोव व ५ नर्सेसवर हा आरोप ठेवला. हे सर्वजण या प्रकरणात दोषी आढळले तर त्यांना २५ वर्षाची शिक्षा होऊ शकते. सध्या या सर्व संशयितांना देश सोडण्याची परवानगी देण्यात आली नाही. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.

अर्जेंटिनाचे विश्वविजेते कर्णधार होते मॅराडोना
पेले यांच्यानंतर फुटबॉल जगतातील सर्वोत्कृष्ट स्ट्रायकर म्हणून मॅराडोना ज्ञात होते. अर्जेंटिनाने जिंकलेल्या १९८६ फुटबॉल विश्वचषकात ते कर्णधार होते. याच विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध त्यांनी केलेल्या गोलला ‘हॅन्ड ऑफ गॉड’ म्हणून संबोधले जाते. निवृत्तीनंतर त्यांनी काही काळ अर्जेंटिनाचा राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद देखील भूषवले होते.

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ भारतीय क्रिकेटपटूची कमाल; टी१० सामन्यांत एकाच षटकात ठोकले सलग ६ षटकार 

‘धवन श्रीलंका दौऱ्यासाठी कर्णधार असावा’, युवा वेगवान गोलंदाजाने कारणासहीत केली शिफारस

चेन्नई सुपर किंग्ज याच दिवशी ४ वर्षांपुर्वी खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्सच्या खूप मागे पडली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---