---Advertisement---

धक्कादायक! ‘या’ जागतिक फूटबॉलपटूच्या मेंदूत गाठी, लवकरच करावी लागणार शस्त्रक्रीया

On: बुधवार, नोव्हेंबर 4, 2020 10:13 PM
---Advertisement---

अर्जेंटीनाचे दिग्गज फुटबॉलपटू डिएगो माराडोना यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्यामुळे त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. माराडोना यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टर लियोपोलडो लूकी यांनी अर्जेंटीना मीडियाला याविषयी माहिती दिली आहे. विश्वचषक विजेते ६० वर्षीय माराडोना यांना काही दिवसांपुर्वीच तब्येत खराब झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.

माराडोना यांच्याविषयी बोलताना डॉक्टर लूकी म्हणाले की, “माराडोना हे जेव्हा हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते तेव्हा त्यांना खूप थकवा जाणवत होता. अनेक चाचण्या केल्यानंतर आम्हाला कळाले की, त्यांना रक्तांच्या गाठी तयार होण्याची समस्या आहे. त्यामुळे आम्ही तुरंत त्यांना ला प्लाटा हॉस्पिटलमधून राजधानीच्या स्पेशलिस्ट क्लिनिकमध्ये हालवले.”

तसेच माराडोना यांची जिवनपद्धती त्यांच्या या स्थितीसाठी जबाबदार ठरल्याचे डॉक्टर लूकी यांनी सांगितले आहे. शिवाय त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याचेही त्यांनी सांगितले.

एका आठवड्यापुर्वी माराडोना यांच्या बॉडीगार्डमध्ये  कोरोनाची लक्षणे आढळली होती.  त्यानंतर माराडोना यांना सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) माराडोना यांनी आपला ६०वा वाढदिवस साजरा केला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

ला लीगा: बार्सिलोनाच्या स्टार फुटबॉलर मेस्सीचा नकोसा पराक्रम

क्रिस्टियानो रोनाल्डोची कोरोनावर मात; युव्हेंट्स संघाने दिली माहिती

पाहावं ते नवलंच! कॅमेराने दाखवला फुटबॉल म्हणून लाईन्समनचा टक्कल

मेस्सीच्या बार्सिलोना संघाच्या थरारक प्रदर्शनामुळे रोनाल्डोचा संघ चितपट, २ वर्षांनंतर घडलं ‘असं’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---