भारतीय क्रिकेट संघाला या महिन्यात 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. दोन्ही संघांसाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या मालिकेसाठी इंग्लंड संघाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. या दौऱ्यापूर्वी भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला पाहुण्या संघाने पाचारण केले असून तो त्याला इंग्लंड लायन्सच्या तयारीसाठी मदत करेल.
भारत-इंग्लंड कसोटी मालिकेच्या नऊ दिवस आधी इंग्लंड लायन्सने दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) याची फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. तो या संघाच्या कोचिंग स्टापचा एक भाग असेल. फलंदाजी सल्लागार म्हणून कार्तिक इंग्लंड संघातील खेळाडूंसोबत भारतीय परिस्थितीचा अनुभव शेअर करेल. (dinesh karthik becomes batting consultant of england lions team for india tour)
दिनेश कार्तिक मुख्य प्रशिक्षक नील किलीन,(Neil Killeen) सहाय्यक प्रशिक्षक रिचर्ड डॉसन,(Richard Dawson) कार्ल हॉपकिन्सन (Carl Hopkinson) आणि माजी इंग्लिश फिरकी गोलंदाज ग्रॅम स्वान (Graeme Swann) यांच्यासोबत इंग्लंड लायन्समध्ये काम करेल. विशेष म्हणजे भारतासोबत इंग्लंडची मालिका सुरू होईपर्यंत कार्तिक इंग्लंड लायन्सशी जोडला जाईल. अशा परिस्थितीत त्याचा कार्यकाळ केवळ 9 दिवसांचा असेल.
इंग्लंड लायन्स संघ अहमदाबाद येथे भारत अ विरुद्ध तीन चार दिवसीय सामने खेळणार आहे. त्याआधी सराव सामनाही होणार आहे. सराव सामना आणि पहिल्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघाचीही घोषणा करण्यात आली आहे.
इंग्लंड संघाला भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आपली तयारी मजबूत करायची आहे. या दौऱ्यात ते कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. कार्तिकशिवाय इंग्लंडचा माजी फलंदाज इयान बेल (Ian Bell) हाही 18 जानेवारीपासून इंग्लिश संघात सामील होणार आहे. बेल सध्या बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्ससोबत सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. इंग्लंड संघाच्या बेसबॉल दृष्टिकोनाची खरी परीक्षा भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत होईल, असे अनेक क्रिकेट दिग्गजांचे मत आहे. (IND vs ENG Karthik will give cricket lessons to England team a key part of England team in the series against India)
हेही वाचा
“तेव्हा भारतीय चाहते रोहितला शिवीगाळ करत होते…”, माजी भारतीय खेळाडूने सांगितली भयानक घटना
T20 World Cup: राहुल की पंत? गावसकरांनी निवडला टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय यष्टिरक्षक