सोमवारी(२६ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना किंग्स इलेव्हन पंजाब संघाशी झाला. या सामन्यात पंजाबने ८ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. असे असले तरी कोलकाता नाईट रायडर्स संघाचा माजी कर्णधार दिनेश कार्तिकसाठी हा सामना वैयक्तिक कारणाने खास ठरला. हा त्याचा ३०० वा टी२० सामना होता.
३०० टी२० सामने खेळणारा तो एकूण चौथाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी रोहित शर्मा, एमएस धोनी आणि सुरेश रैना या तीन भारतीय क्रिकेटपटूंनी ३०० किंवा त्यापेक्षा अधिक टी२० सामने खेळण्याचा कारनामा केला आहे.
पण याचदरम्यान कार्तिकच्या नावावर एक वाईट विक्रम देखील नोंदवला गेला आहे. सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात दिनेश कार्तिक शून्यावर बाद झाला. त्यामुळे तो एकाच आयपीएल हंगामात आठ वेळा एकेरी धावसंख्या (० ते ९ धावा) बनवणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट झाला आहे. तो एका हंगामात ८ वेळा एकेरी धावसंख्येवर बाद होणारा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. त्याच्याआधी गौतम गंभीर(२०१४), रोहित शर्मा (२०१७) आणि शेन वॉट्सन (२०१९) यांनी हा नकोसा विक्रम केला आहे.
सर्वाधिक टी२० सामने खेळणारे भारतीय खेळाडू –
रोहित शर्मा – ३३७
महेंद्र सिंह धोनी – ३२९
सुरेश रैना – ३१९
दिनेश कार्तिक – ३००
आयपीएलमध्ये एका हंगामात ८ वेळा एकेरी धावसंख्येवर बाद होणारे क्रिकेटपटू
गौतम गंभीर २०१४
रोहित शर्मा २०१७
शेन वॉटसन २०१९
दिनेश कार्तिक २०२०
महत्त्वाच्या बातम्या –
रोहितच्या फॅन्सला ‘ही’ गोष्ट समजणे गरजेचं, माजी क्रिकेटपटूचे संघव्यवस्थापनावर ताशेरे
२०२१ मध्ये ‘हा’ खेळाडू करणार सीएसकेचं नेतृत्त्व, संघ व्यवस्थापनाने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख –
कुमार संगकारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बावनकशी सोनं
गोष्ट एका क्रिकेटरची भाग २: ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान संघाशी वैर घेणारा इरफान पठाण
आयपीएलमध्ये डंका वाजलाच, आता ‘मिशन ऑस्ट्रेलिया’; ‘हा’ आर्किटेक्ट बांधणार संघाच्या विजयाचा पूल