fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई विरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार दिनेश कार्तिकची प्रतिक्रिया; म्हणाला ‘या’ क्षेत्रात करावी लागेल सुधारणा

Dinesh karthik direct blame 2 player

September 24, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0

आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा चेन्नई सुपर किंग्सने पराभव केला होता. मात्र काल 23 सप्टेंबर रोजी झालेल्या पाचव्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचा 49 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने 20 षटकांत 5 गडी गमावून 195 धावा केल्या होत्या. त्यास प्रत्युत्तर म्हणून केकेआर संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 146 धावा करू शकला.

फलंदाजीत आणि गोलंदाजीत करावी लागेल सुधारणा

संघाच्या या पराभवामुळे केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिक खूप निराश दिसत होता. या पराभवानंतर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला, “मला वाटते की आम्हाला आमच्या फलंदाजीत व गोलंदाजीत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. आमच्यासाठी हा एक अतिशय वाईट दिवस होता. मी त्याबद्दल फारसे विश्लेषन करू इच्छित नाही. कुठे सुधारणा करायची याची कल्पना संघातील खेळाडूंना आहे.”

‘या’ खेळाडूंनी अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही

केकेआर संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि फलंदाज ओएन मॉर्गनने अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही, असे कर्णधार दिनेश कार्तिकला वाटते. या दोघांच्या कामगिरीवर बोलतांना तो म्हणाला, “कमिन्स आणि मॉर्गन या दोघांनीही क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे. अशा उष्ण वातावरणात खेळणे खूप अवघड आहे.”

पुढे बोलताना तो म्हणाला, “मला जास्त विश्लेषन करायचं नाही. संघातील खेळाडूंनी चांगला प्रयत्न केला. आशा आहे की येत्या सामन्यांमध्ये आम्ही आणखी चांगली कामगिरी करू. याक्षणी मी वरच्या क्रमांकाच्या फलंदाजांबद्दल केकेआरचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्यूलमशी जास्त बोललो नाही. पण पुढच्या सामन्यात तुम्हाला कळेल की आम्ही कोणत्या फलंदाजांना वरच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी देऊ.”

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पुढील सामना शनिवारी 26 सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबाद संघाशी होणार आहे. हा सामना जिंकून केकेआरचा संघ गुणतालिकेत त्यांचे खाते उघडायला तयार आहे. हैदराबादलाही पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

-२ मोठे विक्रम केले पण ‘या’ गोष्टीमुळे मोठ्या विक्रमापासून रोहित शर्मा राहिला दूर

-एका मराठी चाहत्याला आपलं शेवटचं ट्विट करत या महान क्रिकेटपटूने जगातून घेतली एक्झिट

-राजस्थानविरुद्ध पराभव झाल्यानंतर माजी दिग्गज भडकला; म्हणाला, ‘सामना जिंकणार नाहीत हे धोनीने आधीच ठरवले होते,’

ट्रेंडिंग लेख-

-आयपीएलमध्ये एकाच षटकात ३० किंवा त्याहून अधिक धावा देणारे ७ गोलंदाज

-कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर खेळणारे जगातील ३ सर्वोत्तम फलंदाज

-श्रीसंतने मिसबाहचा झेल पकडला आणि….


Previous Post

दिल्ली विरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईचे ‘हे’ दोघे शिलेदार नक्की बरे होतील, संघाला आहे आशा

Next Post

“गेल्या 18 महिन्यांपासून मी अव्वल क्रमांकाचा चिअरलीडर आहे,” पाहा कोण म्हणतंय

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

प्रज्ञान ओझाचा मोठा खुलासा ‘धोनी सामन्यापूर्वी संघातील सदस्यांना देत नाही शुभेच्छा, कारण…”

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

चेन्नईला घाम फोडणारी धुवांधार खेळी केल्यानंतर कमिन्सच्या नावे जमा झाला आयपीएल विक्रम

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

माहीने रचला इतिहास! धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून दक्षिण आफ्रिका संघ होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

KKR vs CSK : आंद्रे रसल, पॅट कमिन्सच्या वादळी अर्धशतकानंतरही कोलकाताचा चेन्नईकडून १८ धावांनी पराभव

April 21, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

मोईन अलीची विकेट सुनील नारायणसाठी ठरली विक्रमी; हरभजनला मागे टाकत केला ‘हा’ विक्रम

April 21, 2021
Next Post

“गेल्या 18 महिन्यांपासून मी अव्वल क्रमांकाचा चिअरलीडर आहे,” पाहा कोण म्हणतंय

दिल्ली संघाचा 'हा' वेगवान गोलंदाज जखमी, पुढील एक- दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता

चेन्नईच्या रखरखत्या उन्हात डीन जोन्सनी केली होती भारताविरुद्ध अफलातून खेळी

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.