शिखर धवनने (Shikhar Dhawan) नुकतीच निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले होते. यानंतर धवनने लिजेंड्स लीग क्रिकेट म्हणजेच एलएलसीच्या आगामी हंगामात खेळण्याची इच्छा बोलून दाखवली होती. धवनच्या पावलावर पाऊल ठेवत आता माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकनेही मोठी घोषणा केली आहे. धवननंतर आता दिनेश कार्तिकही (Dinesh Karthik) लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळताना दिसेल. कार्तिकने यावर्षी जूनमध्ये वाढदिवसाच्या दिवशी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मात्र, आता त्याने एलएलसीमध्ये सामील होण्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अशा प्रकारे डीके आणि गब्बरची जोडी एलएलसीमध्ये धमाका करताना दिसणार आहे.
लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सामील होण्याबद्दल दिनेश कार्तिक म्हणाला की, “या लीगमध्ये खेळणे ही माझ्यासाठी एक गोष्ट आहे, ज्याची मी निवृत्तीनंतर आतुरतेने वाट पाहत होतो. मी या आव्हानासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार आहे. ज्या प्रकारचे क्रिकेट मला नेहमीच आवडते ते खेळण्यास उत्सुक आहे.”
यासोबतच त्याने आपल्या चाहत्यांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. एलएलसी हंगामासाठी निवृत्त खेळाडूंचा लिलाव 29 ऑगस्ट रोजी पार पडेल.
Big news for our fans 👀@DineshKarthik joins the #LegendsLeagueCricket and will take charge as captain of the @SSuper_Stars
Get ready for a blockbuster season 💥#BossLogonKaGame #LLCseason3 #DK #DineshKarthik pic.twitter.com/k3iCcCJmjr
— Legends League Cricket (@llct20) August 27, 2024
दिनेश कार्तिकने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, त्याला फारसे सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने 180 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक कसोटी शतक आणि 17 अर्धशतकांच्या मदतीने एकूण 3463 धावा केल्या. तर, यष्टिरक्षक म्हणून त्याने 172 बळी टिपले. यासह कार्तिकने 257 सामन्यांमध्ये 4842 धावा करत 22 अर्धशतके झळकावत आपली आयपीएल कारकीर्द संपवली. कार्तिकची आयपीएल कारकीर्द जवळपास 17 वर्षे चालली. ज्यामध्ये तो 6 फ्रँचायझींचा भाग होता. त्याने 2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्ससोबत आयपीएल कारकीर्द सुरू केलेली. यानंतर तो 2011 मध्ये पंजाब संघाशी जोडला गेला. त्यानंतर तो मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि आरसीबीकडून खेळला.
हेही वाचा-
पहिल्यांदाच टी20 विश्वचषक खेळणार ‘या’ भारतीय क्रिकेटपटू, डब्लूपीएलमध्ये केलंय शानदार प्रदर्शन
अविश्वसनीय! 137 चेंडू खेळूनही उघडले नाही खाते, इंग्लंडच्या फलंदाजाची खेळी ठरली चर्चेचा विषय
घटस्फोटानंतर नताशाने सांगितला प्रेमाचा अर्थ; म्हणाली, “प्रेम कधी अपमान करत…”