बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने रविवारी (25 डिसेंबर) 3 गडी राखून विजय मिळवला. ढाका येथे झालेल्या या सामन्यात भारताने आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांच्या महत्वपूर्ण खेळीने रोमांचक विजय मिळवला. भारताने या विजयाने दोन सामन्यांची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. भारतीय संघाने यजमान संघाला व्हाईट वॉश दिला असला तरी, भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक हा या विजयामुळे पूर्णतः समाधानी झाला नाही.
भारतीय संघाला या मालिकेत विजयाचा दावेदार मानले जात होते. संघाने मालिकेत विजयही मिळवला. मात्र, भारतीय संघ या मालिकेत कोठेही वर्चस्व गाजवताना दिसला नाही. याच कारणामुळे कार्तिक याने भारतीय संघावर टीका केली. कार्तिक म्हणाला,
“भारतीय संघाने विजय मिळवला याचा नक्कीच आनंद आहे. मात्र, संघाला अजूनही विचार करावा लागेल की तुम्हाला कशा प्रकारचे क्रिकेट खेळायचे आहे. कारण, कर्णधार एक गोष्ट सांगतो आणि संघ दुसऱ्या पद्धतीने खेळताना दिसतो. राहुलने मालिकेआधी आक्रमक क्रिकेट खेळण्याविषयी म्हटलेले. मात्र, पंत व श्रेयस अय्यर वगळता कोणाच्यातही ती आक्रमकता दिसली नाही. बांगलादेश संघ आपल्या संघाला अजिबात घाबरलेला दिसला नाही.”
या सामन्याच्या चौथ्या दिवसाबाबत बोलायचे झाल्यास, ही कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघाला अखेरच्या डावात केवळ 145 धावांचे आव्हान होते. मात्र त्यासाठी भारतीय संघाला आपले 7 गडी गमवावे लागले. अश्विन व अय्यर यांनी शानदार भागीदारी करत अखेर विजय भारताच्या पारड्यात टाकला. या सामन्याचा सामना वीर म्हणून अश्विन याला तर मालिकावीर म्हणून चेतेश्वर पुजारा याला निवडले गेले.
(Dinesh Karthik Not Happy With Team India Approach Against Bangladesh)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हा कसला ऍटिट्यूड! कुलदीपला दुसऱ्या कसोटीतून डच्चू देणारा कर्णधार म्हणाला, ‘मला पश्चाताप होत नाहीये…’
‘या’ दोन चुका भारताला पडल्या असत्या महागात, पण अय्यर- अश्विनच्या भागीदारीने टाकला पडदा; जाणून घ्याच






टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रंगणार दिग्गजांची मैफल! विश्वचषकासाठी ‘स्टार’ कॉमेंट्री पॅनेलची घोषणा