---Advertisement---

धोनीमुळे ‘हा’ यष्टीरक्षक राहिला दुर्लक्षित; तरीही कौतुकाने म्हणाला, ‘त्याने यष्टीरक्षणाची व्याख्या बदलली’

On: शनिवार, जून 5, 2021 8:16 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू एमएस धोनी याला क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाजांमध्ये गणले जाते. धोनीच्या भारतीय संघातील पदार्पणाने त्याच्या समकालीन अनेक यष्टीरक्षकांची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली. त्यापैकीच एक नाव म्हणजे दिनेश कार्तिक. वास्तविकमध्ये धोनीपूर्वी त्याचे भारतीय संघात पदार्पण झाले होते. परंतु पुढील काही काळात धोनीच्या विस्फोटक फलंदाजीमुळे कार्तिक संघाबाहेर गेला.

त्यानंतर कार्तिक आत-बाहेर होत राहिला. परंतु धोनीच्या उपस्थितीमुळे तो संघात आपली जागा पक्की करू शकला नाही. मात्र कार्तिकला या गोष्टीबद्दल अजिबात खेद वाटत नाही. आपल्या देशाकडून खेळण्याची जी संधी मिळाली त्यात तो समाधानी असल्याचे त्याने सांगितले आहे.

खेळाडू सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो
क्रिकेट नेक्सटला मुलाखत देताना कार्तिकने सांगितले कि, ”भारताकडून खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा प्रयत्न असतो की, आपलं सर्वोत्तम दिलं गेलं पाहिजे. मी काही वेगळा नव्हतो. बऱ्याच वेळा आपल्याकडून तशी कामगिरी होते तर कधी होत नाही. पंरतु जसे मी सांगितले की, आता जेव्हा मी मागे वळून माझा प्रवास बघतो. तेव्हा मी जे काही केलंय ते माझ्यासाठी गौरवास्पद आहे.”

आंतरराष्ट्रीय क्रिकेट अवघड
ज्यावेळी धोनी भारतीय संघात यष्टीरक्षक म्हणून स्थिरावला होता, त्यावेळी अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यासाठी कार्तिकला स्वतःच्या फलंदाजीत सुधारणा करावी लागली. त्यामुळे कार्तिकवर त्याचा खूप मोठा दबाव होता. याबद्दल कार्तिकने सांगितले की, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप सारी आव्हाने येत असतात आणि त्यांचा सामना करणे सोपे नसते. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असता; तेव्हा ते नक्कीच अवघड असते. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही त्यातली आव्हाने समजून घेऊन खेळाचा आनंद लुटायला हवा. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायची हिच खरी मजा आहे.”

धोनी आणि गिलख्रिस्टने बदलली व्याख्या
त्यासोबतच कार्तिकने सांगितले की, “धोनी आणि ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्टमुळे यष्टीरक्षणात बरेच बदल झाले आहेत. आजच्या वर्तमान क्रिकेटमध्ये कदाचित एखादा यष्टीरक्षक फलंदाज असेल. परंतु बहुतांश फलंदाजच यष्टीरक्षक आहेत. प्रत्येक कर्णधाराला वाटते की यष्टीरक्षकाने आपल्या फलंदाजीतून सुद्धा संघासाठी योगदान दिले पाहिजे. पूर्वी बरेच मुख्यतः यष्टीरक्षक फलंदाज असायचे. परंतु या दोघांच्या येण्याने हा आमूलाग्र बदल क्रिकेटमध्ये झाला.”

महत्त्वाच्या बातम्या-

युझवेंद्र चहलने व्यक्त केली ‘या’ आयपीएल संघाकडून खेळण्याची इच्छा

मुंबई प्रशिक्षक निवडीचा वाद पोहोचला कोर्टात, माजी अध्यक्षांनी दाखल केली याचिका

विरोधी संघावर ‘त्याचा’ प्रभाव असा पडतो, जसा पुर्वी सेहवाग-गिलख्रिस्टचा असायचा; कार्तिकचे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---