बुधवारी (२५ मे) आयपीएल २०२२चा एलिमिनेटर सामना खेळला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि लखनऊ सुपरजायंट्स आमने सामने होते. बेंगलोरने १४ धावांच्या फरकाने हा सामना जिंकत क्वालिफायर २ साठी पात्रता मिळवली आहे. क्वालिफायर २ मध्ये त्यांच्यापुढे राजस्थान रॉयल्सचे आव्हान असेल. तत्पूर्वी बेंगलोर संघाचा धाकड फलंदाज दिनेश कार्तिक याला दंड झाला आहे.
बेंगलोरच्या (Royal Challengers Bangalore) यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे लखनऊविरुद्धच्या एलिमिनेटर (Eliminator Match) सामन्यादरम्यान आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल फटकारण्यात (Dinesh Karthik Reprimanded) आले आहे.
कार्तिकवर आयपीएलच्या आचारसंहितेनुसार कलम २.३च्या अंतर्गत लेवल १ चा आरोप लावण्यात आला होता, जो त्याने मान्य केला असून कारवाईही मंजूर केली आहे, असे आयपीएलने त्यांच्या विधानात म्हटले आहे. आचारसंहितेच्या स्तर १ चे उल्लंघन केल्यास, सामनाधिकारीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. असे असले तरीही, अद्याप कार्तिकला कोणत्या कारणासाठी ही शिक्षा देण्यात आली आहे, याबद्दल कसलीही माहिती दिली गेलेली नाही.
Dinesh Karthik has breached IPL code of conduct in the Eliminator of IPL 2022 – he has admitted the offence.
— Johns. (@CricCrazyJohns) May 27, 2022
एलिमिनेटर सामन्यात कार्तिकची ताबडतोब खेळी
दरम्यान लखनऊविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात कार्तिकने नेहमीप्रमाणे ताबडतोब खेळी केली होती. त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २३ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३७ धावा फटकावल्या होत्या. तसेच रजत पाटीदारच्या नाबाद ११२ धावांच्या खेळीच्या जोरावर बेंगलोरने या सामन्यात २०७ धावा फलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात लखनऊचा संघ ६ विकेट्सच्या नुकसानावर १९३ धावाच करू शकला होता. अशाप्रकारे बेंगलोरने १४ धावांची हा सामना जिंकला होता.
दिनेश कार्तिकची आयपीएल २०२२मधील कामगिरी
तसेच कार्तिकने आयपीएलच्या चालू हंगामात १५ सामने खेळताना ६४.८० च्या सरासरीने ३२४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक अर्धशतक निघाले आहे. त्याची सर्वोच्च वैयक्तिक खेळी नाबाद ६६ धावा इतकी राहिली आहे. कार्तिकने बऱ्याचशा सामन्यात बेंगलोरसाठी मॅच फिनिशकची भूमिका निभावली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आरसीबीच्या विजयासाठी ‘या’ खेळाडूची विकेट होती सर्वात महत्त्वाची, दिनेश कार्तिकने सांगितले नाव
टीम इंडिया एशिया कपच्या सुपर फोरमध्ये दाखल; इंडोनेशियाला १६-० ने धूळ चारत पाकिस्तानला केले बाहेर
‘…तर उमरान मलिक भारतासाठी दीर्घकाळ खेळू शकतो’, बासीसीआय अध्यक्ष गांगुलीने केले स्पष्ट