---Advertisement---

चौथ्या टी२०पूर्वी कार्तिकची वेस्ट इंडिजला चेतावणी; म्हणाला, ‘मालिका जिंकण्याच्या हेतूनेच…’

On: शनिवार, ऑगस्ट 6, 2022 12:57 PM
Dinesh-Karthik
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिले सामने पार पडले असून भारतीय संघ या ३ सामन्यांनंतर २-१ ने मालिकेत आघाडीवर आहे. आता उभय संघातील चौथा सामना शनिवारी (०६ ऑगस्ट) फ्लोरिडा येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा फिनिशर दिनेश कार्तिक याने प्रतिस्पर्धी वेस्ट इंडिज संघाला चेतावणी दिली आहे. तसेच कार्तिकने भारतीय संघापुढील आव्हानाबद्दलही भाष्य केले आहे.

कार्तिक (Dinesh Karhtik) म्हणाला की, “आम्ही विजयासह टी२० मालिकाही (T20I Series) खिशात घालण्यासाठी आज मैदानावर उतरणार आहोत. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की, वेस्ट इंडिजचा (West Indies vs India) संघ किती चांगला आहे. परंतु एक महत्त्वाची गोष्ट, जी आम्हाला सर्वांना सांगितली जात आहे. ती म्हणजे, या सामन्यापूर्वी आम्हाला शक्य तितक्या फ्लोरिडातील परिस्थितींना समजून घ्यावे लागणार आहे आणि त्यानुसार खेळ करावा लागणार आहे.”

“सेंट किट्स येथे झालेल्या दुसऱ्या व तिसऱ्या टी२० सामन्यामध्ये आम्हाला तेथील परिस्थितींना समजून घ्यायला खूप वेळ गेला होता. आम्ही तेथील परिस्थितीशी तितके अनुकूल होऊ शकलो नव्हतो, जितके आम्हाला व्हायचे होते. येथे मियामीमध्ये आम्हाला परिस्थिती आणि स्थिती समजून घेत शानदार प्रदर्शन करावे लागेल,” असेही कार्तिकने पुढे म्हटले.

टी२० मालिकेसाठी यातून निवडले दोन्ही संघ-

वेस्ट इंडिज संघ: निकोलस पूरन (कर्णधार), रोव्हमन पॉवेल (उपकर्णधार), शामराह ब्रूक्स, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, काइल मेयर्स, ओबेद मॅककॉय, कीमो पॉल, रोमॅरियो शेरड ओडियन स्मिथ, डेव्हॉन थॉमस, हेडन वॉल्श जूनियर.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, दीपक हुड्डा, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), आर अश्विन, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक, ईशान किशन, रिषभ पंत, अर्शदीप सिंह, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

CWG2022: एका घटनेने ‘सोनेरी स्वप्ना’चा चुराडा, भारतीय महिला हॉकी संघाने गमावली सेमीफायनल

काय आहे ‘कुलचा’ जोडी फुटण्याचे कारण? माजी दिग्गजाने सांगितली निवडकर्त्यांची अडचण

विराट, रोहितसोबत जे घडतंय, तेच सचिन आणि गांगुलीसोबतही घडून गेलंय; बीसीसीआय अधिकाऱ्याचे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---