आपण भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकबद्दल विचार केला तर आता तो फक्त कॉमेंट्री करताना दिसत आहे. पण पुन्हा एकदा कार्तिक तुम्हाला कर्णधारपद भूषविताना दिसणार आहे. तामिळनाडू संघाने या अनुभवी खेळाडूला आगामी विजय हजारे ट्रॉफी 2023-24 साठी कर्णधार बनवले आहे. ही स्पर्धा 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून अंतिम सामना 16 डिसेंबरला होणार आहे.
दिनेश कार्तिक (Dinesh Kartik) याने 2021 मध्ये व्हाईट-बॉल स्पर्धेत तामिळनाडूचे अखेरचे नेतृत्व केले होते. आगामी विजय हजारे ट्रॉफीसाठी तामिळनाडूने गुरुवारी फक्त कर्णधाराची घोषणा केली परंतु संघ नंतर जाहीर केला जाणार आहे.
वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने नुकत्याच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत तामिळनाडू संघाचे नेतृत्व केले होते. यावेळी सुंदरची 2023 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर होणार्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I मालिकेसाठी निवड होणे अपेक्षित आहे, त्यामुळेच त्याला कर्णधारपद देण्यात आलेले नाही.
गेल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये तमिळनाडूचा संघ उपांत्यपूर्व फेरीत सौराष्ट्रकडून पराभूत झाला होता. या संघाने 2016-17 च्या मोसमात अखेरचा विजय हजारे करंडक जिंकला होता. हा संघ या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे, कारण या संघाने सर्वाधिक म्हणजे पाच वेळा विजय हजारे ट्रॉफी जिंकली आहे. अशा स्थितीत दिनेश कार्तिकच्या पुनरागमनाने संघाला पुन्हा विजयी दिवस येण्याची आशा आहे.
मागच्या वेळी तामिळनाडूने ही ट्रॉफी जिंकली तेव्हा दिनेश कार्तिकने मोलाचे योगदान दिले होते. कार्तिक त्या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही होता. आता कार्तिक यावेळीही आपल्या संघासाठी काही खास करू शकतो का, हे पाहावे लागेल. (Dinesh Karthik will once again lead the captaincy of this team)
म्हत्वाच्या बातम्या
कर्णधार बनायला तयार नव्हता रोहित, गांगुलीने ‘ती’ अट घालताच दिला होकार, ‘दादा’चा खुलासा
अहमदाबादेत अफगाणिस्तानने जिंकला टॉस, आफ्रिकेने केले दोन दमदार बदल, पाहा Playing XI