जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यापासून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने समालोचन क्षेत्रात पाऊल टाकले. यानंतर त्याने अवघ्या काही काळात क्रिकेटप्रेमींना त्याच्या समालोचनाने भूरळ पाडली. सध्या इंग्लंड विरुद्ध भारत संघात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेदरम्यानही कार्तिक स्काय स्पोर्टस वाहिणीसाठी समालोचन करत आहे. दरम्यान, त्याच्या एका वक्तव्यामुळे तो वादात अडकू शकतो.
नाॅटींघमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी सामन्यादरम्यान त्याने भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्यावर एक विनोदापूर्ण विधान केले. मात्र, या विधानामुळे वाद निर्माण होताना दिसत आहे. सोशल मिडीयावर एका वापरकर्त्याने त्याचे विधान शेयर केले आहे.
सामन्याच्या चौथ्या दिवशी स्काय स्पोर्टसच्या कारयक्रमादरम्यान दिनेशने शार्दुल ठाकुरचे कौतुक केले. तो म्हणाला, “शार्दुल नेहेमी शिकण्यासाठी एवढा उत्सुक असतो की, मला विश्वास आहे, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांनी शार्दुलला शिकवण्यापेक्षा तोच अरुण यांना जास्त शिकवत असेल.”
“Shardul teaches Bharat Arun more bowling than what Bharat Arun teaches Shardul” – DK.
— Cricket With Ash (@CricketWithAsh) August 7, 2021
दिनेशच्या या विधानावर सध्या विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काहींनी शार्दुलच ठाकुरचेही कौतुकही केले आहे. दिनेश कार्तिक मागच्या काही काळापासून त्याच्या ट्विटवरुन सातत्याने चर्चेत असतो. दरम्यान, यापूर्वीही समालोचन करताना त्याने एकदा असेच वादग्रस्त विधान केले होते, ज्याबद्दल त्याला माफी मागावी लागली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
बुमराहची विक्रमी कामगिरी! ट्रेंट ब्रिज कसोटीत ९ विकेट्स घेत जहीर, इरफानसारख्या दिग्गजांना टाकले मागे
ब्रॉडच्या यशाचे हेडबँड कनेक्शन? वाचा नक्की काय आहे प्रकरण
अश्विनची खरी स्पर्धा जडेजा नव्हे, तर ‘या’ भारतीय खेळाडूबरोबर, माजी भारतीय क्रिकेटरचे मत