भारतीय संघाचा दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला (dinesh kartik) भारताच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन करायचे आहे. आणि पुन्हा एकदा संघात पुनरागमन करण्याची त्याची इच्छा आहे. तो अजूनही भारतीय संघात फिनीशरची भुमिका बजावू शकतो, असे त्याला वाटते. दिनेश कार्तिक बराच काळ झाला भारतीय संघाचा (team india) भाग नाही. त्याने भारतीय संघासाठी २०१९ मध्ये शेवटचा सामना खेळला होता. तो गेल्या काही वर्षांत आयपीएलमध्येही खास कामगीरी करु शकलेला नाही. भारतीय संघाला सध्या शानदार कामगिरी करणाऱ्या फिनीशरची गरज आहे, पण दिनेश कार्तिकची कामगिरी पाहता हे स्वप्न साकार होणे फार कठीण आहे.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ३६ वर्षीय दिनेश कार्तिकने कोरोना महामारीच्या काळात त्याच्या समालोचन कार्यकाळात तो काय शिकला? हे सांगितले आहे. तसेच तमिळनाडू क्रिकेटचा विकास होताना पाहणे कसे आनंददायक आहे? याबद्दल सुद्धा सांगितले आहे. तो सध्या भारतीय संघाकडून खेळण्यास पूर्णपणे तयार आहे. त्याचे देशासाठी खेळण्याचे स्वप्न आहे. विशेषत: टी २० क्रिकेटमध्ये भारताकडून खेळण्याची इच्छा असल्याचे कार्तिक म्हटले आहे.
व्हिडिओ पाहा- काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
कार्तिकने भारतासाठी ३२ टी २० सामने खेळले आहेत. त्याने बांगलादेशविरुद्ध निदाहास ट्रॉफी २०१८ च्या अंतिम सामन्यामध्ये ८ चेंडूंमध्ये केवळ २९ धावांची संस्मरणीय खेळी खेळली होती. भारताकडून टी२० खेळण्याच्या स्वप्नावर बोलताना कार्तिक म्हणाला, “गेल्या टी २० विश्वचषकात भारताकडे चांगला फिनिशर नव्हता आणि मला या ठिकाणी खेळायचे आहे.” टी२० मध्ये फिनिशर म्हणून कार्तिकची आकडेवारी चांगली आहे.
दिनेश कार्तिकने कोरोनाच्या काळात कॉमेंट्रीमध्ये केलेल्या कामगीरीमुळे संपूर्ण जगाने त्याचे कौतुक केले. कार्तिक ज्या पद्धतीने खेळाला समजतो, त्याचा सर्वांनीच स्वीकार केला. त्याचे म्हणणे आहे की त्याला आत्ता पुर्णपणे समालोचनात जायचे नाही. खेळणे ही त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि तो सध्या क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत नाही.
हेही वाचा- वॉशिंग्टनचा नवा ‘रजनीकांत’ लूक दिसतोय खूपच सुंदर; फोटो शेअर करत म्हणे, ‘हिला डाला ना’
भारतीय क्रिकेटमधील तमिळनाडूच्या वर्चस्वावर बोलताना तो म्हणाला, “माझ्यासाठी हा सर्वात मोठा आनंद आहे. या सर्व मुलांनी देशाचे प्रतिनिधित्व करताना पाहायचे आहे. या सर्व खेळाडूंची फक्त दोनच ध्येय आहेत. त्यांना सुरुवातीला आयपीएलचा भाग व्हायचे आहे आणि नंतर देशासाठी खेळायचे आहे. तमिळनाडूने चांगली कामगीरी केली आहे. गतवर्षी १४ खेळाडू आयपीएल संघाचा भाग होते. ते पाहून मी खुप खुश झालो होतो.”
दिनेश कार्तिक म्हणाला कि, “अष्टपैलू शाहरुख खान भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या खूप जवळ आहे. जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो संघासाठी चांगली कामगीरी करेल. भारत खुप वर्षांपासुन क्रिकेटमध्ये चांगली कामगीरी करत आहे, त्यामुळे आम्हाला जिंकण्याची सवय आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा पराभुत होतो, तेव्हा कशी प्रतिक्रीया द्यावी हे आम्हाला समजत नाही. खेळाडूंनाही माहित असते की एक दिवस तुम्ही हिरो आहात. पण जर तुम्ही खराब कामगीरी केली नाही तर तुम्ही शुन्य होता. खेळाडू त्याचा अवलंब करत आहेत, सध्या सोशल मिडीयाच्या आगमनाने ते कठीण झाले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
चेंडू स्टंप्सला लागूनही फलंदाज नाबाद, हसत उडवली भारतीय संघाची खिल्ली; पण पुढे झाला क्लिन बोल्ड
वॉशिंग्टनचा नवा ‘रजनीकांत’ लूक दिसतोय खूपच सुंदर; फोटो शेअर करत म्हणे, ‘हिला डाला ना’
अंडर-१९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे लाईन अप निश्चित, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘या’ दिवशी भिडणार भारत
हेही पाहा-