भारताचा फलंदाज दिनेश मोंगियाने बुधवारी सर्वप्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. त्याने भारताकडून 12 वर्षांपूर्वी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे.
मोंगियाने भारताकडून मार्च 2001 ला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर मोंगिया भारताकडून 57 वनडे सामने खेळला. त्याने यामध्ये 27.95 च्या सरासरीने 1230 धावा केल्या. यात त्याच्या एका शतकाचा आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.
तसेच 2003 च्या विश्वचषकात उपविजेते ठरलेल्या भारतीय संघातही मोंगियाचा समावेश होता.
त्याचबरोबर 1 डिसेंबर 2006 ला भारतीय संघाने टी20 इतिहासातील खेळलेल्या पहिल्याच सामन्यातही मोंगिया खेळला. या सामन्यात त्याने भारताकडून सर्वाधिक 38 धावा केल्या होत्या. पण नंतर तो जेव्हा इंडियन क्रिकेट लीग खेळला त्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली.
त्याने मे 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला. हा त्याचा भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना देखील ठरला.
42 वर्षीय मोंगियाने त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत 121 सामने खेळले. यात 48.95 च्या सरासरीने 8028 धावा केल्या. यामध्ये त्याच्या 27 शतकांचा आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 198 अ दर्जाचे सामने खेळताना 35.25 च्या सरासरीने 5535 धावा केल्या.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–फिक्सिंग प्रकरणाबाबत कोहली-धोनीबद्दल एसीयू प्रमुखांनी केले मोठे भाष्य, म्हणाले…
–विराट कोहली-कागिसो रबाडाबद्दल क्विंटॉन डीकॉकने केले मोठे भाष्य
–एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला…