---Advertisement---

एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला…

On: मंगळवार, सप्टेंबर 17, 2019 7:07 PM
---Advertisement---

मागील अनेक दिवसांपासून भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा होत आहेत. अनेक दिग्गजांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल विविध मते मांडली आहेत. आता भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटले आहे की भारताचा कर्णधार विराट कोहली आणि निवड समीतीने याबद्दल निर्णय घ्यायला हवा.

आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार कोलकतामध्ये एका कार्यक्रमादरम्यान गांगुली म्हणाला, ‘मला माहित नाही निवड समीती सदस्य आणि विराट कोहली काय विचार करतात. ते महत्त्वाचे व्यक्ती आहेत, त्यांना हा निर्णय घेऊदे.’

त्याचबरोबर सध्या भारतीय संघाची मायदेशात दक्षिण आफ्रिका संघाबरोबर टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ2 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकांमध्ये भारताचे पारडे जड असल्याचेही गांगुलीने म्हटले आहे.

गांगुली म्हणाला, ‘भारत विजयाचा प्रबळ दावेदार आहे. भारत मायदेशात धोकादायक संघ आहे. मागील काही वर्षांपासून त्यांना पराभूत करणे अवघड आहे.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

कुटुंबाशी निगडीत वृत्त छापल्याने बेन स्टोक्सने ब्रिटिश वृत्तपत्राला फटकारले

रोहित शर्माने कसोटीत ओपनिंग करण्यावर या माजी क्रिकेटपटूने उपस्थित केले प्रश्नचिन्ह

स्टिव्ह स्मिथ-जॅक लीचचा हा खास फोटो होतोय जोरदार व्हायरल…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment