---Advertisement---

विराट कोहली-कागिसो रबाडाबद्दल क्विंटॉन डीकॉकने केले मोठे भाष्य

On: मंगळवार, सप्टेंबर 17, 2019 8:06 PM
---Advertisement---

उद्या (18 सप्टेंबर) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात दुसरा टी20 सामना होणार आहे. हा सामना मोहाली येथे होणार आहे. या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार क्विंटॉन डीकॉकने पत्रकारांशी संवाद साधला.

डीकॉककडे पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेच्या टी20 संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले आहे. याबद्दल बोलताना डीकॉक म्हणाला, ‘मी जास्त चिंतीत नाही. माझ्या कारकिर्दीतील हा नवीन टप्पा आहे.

‘यामुळे मला संघात ज्यादाची जबाबदारी मिळाली आहे. ही जबाबदारी मला कशी निभावता येईल ते आता पाहू. यामुळे माझ्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो किंवा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, पण याबद्दल आत्ताच काही सांगणे घाईचे ठरेल. मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल.’

त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांच्यात रंगणाऱ्या द्वंद्वाबद्दल डीकॉक म्हणाला, ‘ते दोघेही चांगले खेळाडू आहेत. विराट कोहली आणि कागिसो रबाडामधील स्पर्धा चांगली आहे. दोघांच्याही खेळण्याची शैली आक्रमक आहे. त्या दोघांमधील द्वंद्व पाहणे चाहत्यांसाठी मजेदार ठरेल.’

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिला टी20 सामना रविवारी(15 सप्टेंबर) पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाला होता. याबद्दल डीकॉक म्हणाला, ‘पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे सामना रद्द होणे ही आदर्शवत नाही. पण आता जे आहे ते आहे. आता ही 2 सामन्यांची मालिका झाली आहे. आता त्याकडे लक्ष आहे.’

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

एमएस धोनीच्या निवृत्तीबद्दल भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाला…

कुटुंबाशी निगडीत वृत्त छापल्याने बेन स्टोक्सने ब्रिटिश वृत्तपत्राला फटकारले

रोहित शर्माने कसोटीत ओपनिंग करण्यावर या माजी क्रिकेटपटूने उपस्थित केले प्रश्नचिन्ह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment