डेविड वॉर्नरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 2018 साली चेंडूशी छेडछाड केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने डेविड वॉर्नवर कर्णधारपदासाठी अजीवन नंर्बंध घातले होते. आता हे निर्बंध बोर्डाकडून लवकरच उठवले जाऊ शकतात. वॉर्नर सध्या ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार बनण्यासाठी प्रमुख दावेदार आहे.
वॉर्नवरील कर्णधारपदाचे अजीवन निर्बंध उठवण्याचा विचार क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे डायरेक्टर करत असल्याचे सांगितले जात आहे. एरॉन फिंच (Aaron Finch) याने काही दिवासंपूर्वी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून ऑस्ट्रेलियाला आता नवीन एकदिवसीय कर्णधाराची आवश्यता आहे. डॅविड वॉर्नर (David Warner) ही भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो, पण त्याला सध्या त्याच्यावर कर्णधारपदाचे निर्बंध असल्यामुळे तो एकदिवसीय संघाचे नेतृत्व करू शकत नाही. माध्यमांमध्ये अशा बातम्या समोर येत आहेत की, बोर्ड या आठवड्याभरात वॉर्नरवरील सर्व निर्बंध मागे घेईल.
एएपी (AAP)ने देलेल्या वृत्तानुसार, “सीएला (Cricket Australia) नियमात बदल कदल करावे लागतील. जेणेकरून वॉर्नरवरील निर्बंध हटवले जाऊ शकतील. होबार्टमध्ये सुरू होणाऱ्या बैठकीत बोर्डाचे डायरेक्टर याविषयी चर्चा करतील.” क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष लाचलान हेंडरसन यांच्या हावाल्याने वृत्तात माहिती दिली गेली की, गरज पडली तर नियमात बदल केले जातील. दरम्यान वॉर्नरने स्वतः यापूर्वी क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत बोलला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 2018 मध्ये डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ आणि कॅमरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर एका लाजिरवाण्या कृत्यामुळे ही मोठी कारवाई केली होती. तेव्हा दक्षिण आफ्रिका संघासोबत ऑस्ट्रेयन संघ तिसरा कसोटी सामना खेळत होता. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बॅनक्रॉप्ट चेंडूशी छेडछाड करताना पकडला गेला होता. त्याने सॅडपेपरच्या वापर करून चेंडू घासल्याचे समोर आले होते. तेव्हा संघाचा उपकर्णधार असलेला वॉर्नर या सर्व प्रकारात प्रमुख सूत्रधार असल्याचे सांगितले गेले होते, तर कर्णधार स्टीव स्मिथला याविषयी सर्वकाही आधीच माहिती असल्याचेही उघड झालेले.
याच पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॅनक्रॉप्टवर 6 महिन्यांची, तर स्मिथ आणि वॉर्नरवर एक-एक वर्षाची बंदी घातली होती. यावेळी बोर्डाने स्मिथकडून संघाचे कर्णधारपद काढून घेतले होते आणि पुढचे दोन वर्ष त्याला कर्णधार बनता येणार नसल्याचेही सांगितले होते. पण दुसरीकडे वॉर्नरला मात्र स्मिथच्या तुलनेत अधिक मोठी शिक्षा सुनावली गेली होती. बोर्डाने वॉर्नर या प्रकाराचा प्रमुख असल्यामुळे तो कारकिर्दीत कधीच संघाचा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार बनणार नाही, असे सांगितले होते. पण आता बोर्ड हा निर्णय मागे घेणार असल्याचे सांगितले जात आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
काय चाललंय! ऑस्ट्रेलियात दुसऱ्या सराव सामन्यातही रिषभ पंत फेल, टी20 विश्वचषकातून होणार हाकालपट्टी?
जेव्हा पंच असलेल्या वडिलांनी ‘बाप’ निर्णय घेत फलंदाज मुलाला दिले होते बाद






