भारतीय संघाचा पुढील नियमीत टी20 कर्णधार कोण असणार? या प्रश्नाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भारतीय क्रिकेटशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहवालानुसार, भारताच्या पुढील टी20 कर्णधारावरून वाद सुरू आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात मतभेद असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या क्रिकेट विश्वात भारताच्या पुढील टी20 कर्णधाराची चर्चा सुरू आहे. बीसीसीआयच्या निर्णयाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 2024 च्या टी20 विश्वचषक विजेत्या संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या हा माजी कर्णधार रोहित शर्माच्या जागी खेळणार असल्याचा दावा यापूर्वीच्या अनेक अहवालांनी केला होता. पण अचानक पुन्हा एक रिपोर्ट आला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दुसऱ्या अहवालात हार्दिकला कर्णधारपद मिळणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे. सूर्यकुमार यादव हा नवा कर्णधार होण्याचा सर्वात मोठा दावेदार आहे. मात्र, आता आलेली बातमी आश्चर्यकारक आहे.
रिपोर्टनुसार, बीसीसीआय सचिव जय शाह यांना हार्दिक पांड्याने टी20 संघाची जबाबदारी सांभाळावी अशी इच्छा आहे. मात्र, गौतम गंभीर यासाठी तयार नाही. टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवावी, अशी गंभीरची इच्छा आहे. याबाबत दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. दुसऱ्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की गंभीरला वारंवार दुखापती, ब्रेक घेणे आणि कामाचा ताण यामुळे हार्दिक पांड्याला कर्णधार बनवायचे नाही.
वृत्त अहवालानुसार, आज (18 जुलै) श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. खरं तर, यापूर्वी अनेक अहवालांमध्ये दावा करण्यात आला होता की, श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी आणि तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी बुधवारी (17 जुलै) संघाची घोषणा केली जाईल. मात्र, त्यानंतर अचानक निवड बैठक पुढे ढकलण्यात आले होते.
महत्तवाच्या बातम्या-
आगामी श्रीलंकेदाैऱ्यापूर्वी केएल राहुल चर्चेत! मुंबईमध्ये खरेदी केले चक्क इतक्या किमतीचे घर
मुंबईच्या स्टार ओपनरची श्री समाधी मंदिराला भेट, वाढदिवसादिवशी ईशान किशन साई चरणी लीन
बार्कलेनंतर जय शहा सांभाळणार आयसीसीचे अध्यक्षपद? आयसीसी वार्षिक बैठकीत निर्णय होण्याची शक्यता