---Advertisement---

अन् सिब्लीच्या कॅचने सर्वांना झाली चेन्नई कसोटीतील पुजाराच्या विकेटची आठवण, पाहा व्हिडिओ 

On: शनिवार, मार्च 6, 2021 2:07 PM
---Advertisement---

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा पहिला डाव ३६५ धावांवर संपल्यानंतर इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. मात्र, त्यांचा सलामीवीर डॉम सिब्ली दुर्दैवीरित्या झेलबाद झाला. त्याच्या झेलबाद होण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

नक्की काय झाले? 

इंग्लंडचा संघाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करत असताना १० वे षटक अक्षर पटेल टाकत होता. त्याच्या या षटकातील शेवटच्या चेंडूवर सिब्लीने चांगला स्वीपचा फटका खेळला होता. मात्र, त्याने मारलेल्या फटक्यामुळे चेंडू शॉर्ट-लेगला उभ्या असणाऱ्या शुबमन गिलच्या डाव्या पॅडला लागून वर उडाला. त्यानंतर यष्टीरक्षक रिषभ पंतने चपळाने हा चेंडू झेलला. त्यामुळे चांगला फटका मारल्यानंतरही सिब्लीला दुर्दैवीरित्या ३ धावांवर बाद व्हावे लागले.

https://twitter.com/PrithviMatka/status/1368097629905723394

https://twitter.com/somnath20094585/status/1368098083557416960

सिब्लीच्या बाद होण्याने इंग्लंडला तिसरा धक्का

सिब्ली बाद होण्याआधी ५ व्या षटकात आर अश्विनने इंग्लंडच्या जॅक क्रॉली आणि जॉनी बेअरस्टोला लागोपाठ २ चेंडूवर बाद केले होते. तसेच सिब्लीनंतर अक्षरने धोकादायक बेन स्टोक्सलाही २ धावांवर माघारी धाडले. त्यामुळे इंग्लंडला ३० धावांवरच ४ धक्के बसले.

तत्पूर्वी भारताचा पहिला डाव ३६५ धावांवर संपल्याने भारताने १६० धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर संपला होता.

सिडनी कसोटीत पुजारा देखील झाला होता असाच बाद 

भारत विरुद्ध इंग्लंड संघातील कसोटी मालिकेतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटीत पुजारा देखील दुर्दैवीरित्या बाद झाला होता.

त्या सामन्यात पुजारा ७३ धावांवर फलंदाजी करत असताना डॉमनिक बेसने आखुड टप्प्याचा चेंडू टाकला. यावर पुजाराने पुलचा फटका मारला. मात्र, चांगला फटका मारुनही फॉरवर्ड लेगला क्षेत्ररक्षण करत असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या डाव्या खांद्याला चेंडू लागला आणि उडाला. त्यावेळी मिड-विकेटचा क्षेत्ररक्षक रॉरी बर्न्सने तो चेंडू पकडला. त्यामुळे एक चांगला फटका मारुनही पुजाराला बाद व्हावे लागले होते.

https://twitter.com/ChloeAmandaB/status/1358363095509307392

अहमदाबादला सुरु असलेला हा कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

व्हिडिओ: तू यष्टीमागे इतकी बडबड का करतो? रोहितच्या प्रश्नावर रिषभचे मन जिंकणारे उत्तर

पंत, सुंदर आणि अक्षरमध्ये विक्रमी भागीदाऱ्या, तब्बल ४० वर्षांनंतर भारतीय संघाकडून झाला ‘हा’ मोठा पराक्रम

पंत, सुंदर आणि अक्षरमध्ये विक्रमी भागीदाऱ्या, तब्बल ४० वर्षांनंतर भारतीय संघाकडून झाला ‘हा’ मोठा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---