आयपीएलमध्ये यंदा मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळणारा सुर्यकुमार यादव सातत्याने चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करत आहे. पण असे असतानाही त्याची नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एकाही भारतीय संघात निवड झालेली नाही. त्यामुळे सध्या भारतीय निवड समीतीवर चोहोबाजूंनी टिका होत आहे. यात आता के. श्रीकांत यांचही नाव जोडले गेले आहे. त्यांनीही भारतीय निवड समीतीवर निशाणा साधला आहे.
बुधवारी(२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सकडून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध सुर्यकुमारने ४३ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ७९ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे मुंबईने १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग १९.१ षटकात सहज पूर्ण केला. त्याच्या या खेळीनंतर के. श्रीकांत यांनी ट्विट करत त्याची भारतीय संघात न निवड करण्याबद्दल प्रश्न उपस्थित केला.
त्यांनी ट्विट केले की ‘सुर्यकुमारची शानदार खेळी. माहित नाही त्याने भारतीय संघाची जर्सी घालण्यासाठी अजून काय करायला पाहिजे. त्याची शानदार खेळी पाहाताना मजा आली. आशा आहे की लवकरच त्याला भारतीय संघाची जर्सी घालून अशी खेळी करताना पाहायला मिळेल.’
What a knock by @surya_14kumar! Don't know what else he can do to wear the national colours! Brilliant knock a treat to watch and hope to see you do the same in the Indian colours soon! #MIvsRCB #IPL
— Kris Srikkanth (@KrisSrikkanth) October 28, 2020
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सुर्यकुमारकडे दुर्लक्ष –
२६ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. या दौऱ्यासाठी भारतीय संघात सुर्यकुमारची निवड होईल, असे अनेकांना अपेक्षित होते. मात्र त्याची निवड झाली नाही. त्यामुळे अनेक दिग्गजांनीही नाराजी व्यक्त केली आहे. तसेच चाहत्यांनाही सुर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड न केल्याने विराटवर निशाणा साधला होता.
पुढील महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात ३ टी२०, ३ वनडे आणि ४ कसोटी सामन्यांच्या मालिका होतील.
महत्त्वाच्या बातम्या –
मी आहे ना! विजयानंतर सूर्यकुमार यादवने संघातील खेळाडूंकडे पाहून केला इशारा, पाहा व्हिडीओ
रोहित शर्माने सुर्यकुमारची प्रतिभा ९ वर्षांपूर्वीच जाणली होती? व्हायरल होतोय ट्विट
ट्रेंडिंग लेख –
-Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
-SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर
-हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय






