रविवारी (14 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडिज संघातील दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. या मालिकेतील दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवत विंडिजला व्हाईटवॉश दिला.
या मालिकेत 18 वर्षीय युवा फलंदाज पृथ्वी शॉने दमदार कामगिरी करत मालिकावीराचा पुरस्कारही पटकावला. त्याने या मालिकेत एक शतक, एक अर्धशतकाच्या सहाय्याने 118.50 च्या सरासरीने 237 धावा केल्या.
त्याच्या या कामगिरीचे आणि निर्भीड फलंदाजीचे भारताचा कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे.
विराट म्हणाला, ‘त्याच्याकडे पाहुन वाटते की तो तुम्हाला हवी असणारी सुरुवात करुन देतो, विशेष म्हणजे कोणत्याही मालिकेत खेळताना पहिली छाप पाडणे महत्त्वाचे असते. संघात असा निडर खेळाडू असणे चांगले असते. तो चूकीचा नसून त्याच्यामध्ये त्याच्या खेळाबद्दल पूर्ण आत्मविश्वास आहे.’
‘तो आक्रमक आहे, पण त्याचे खेळताना स्वत:वर नियंत्रण असते. नवीन चेंडूविरुद्ध ही खूप दुर्मिळ गुणवत्ता आहे. त्याला अनेक फटके मारणे माहित आहे आणि त्यावर त्याचे योग्य नियंत्रणही असते. हे खूप चांगले आहे. मला असे वाटत नाही की आम्ही वयाच्या 18-19 व्या वर्षी त्याच्या 10 टक्केही आसपास होतो. पण त्याला यावरुन पुढे जायचे आहे.’
भारताचा आॅस्ट्रेलिया दौरा 21 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात भारत 3 टी20, 4 कसोटी आणि 3 वनडे सामने खेळणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
–ISL 2018: दोनदा विजेतेपद मिळवणाऱ्या या संघांचा सुरू आहे संघर्ष
–पृथ्वी शॉ, रिषभ पंतची कसोटी क्रमवारीत मोठी झेप…