श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली असून टी20 मालिकेसाठी स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्त्वाखाली 27 जुलैपासून भारतीय संघ श्रीलंकाविरुद्ध 3 सामन्यांची टी20 मालिका खेळेल. 30 जुलैला शेवटचा सामना होईल. हे सर्व सामने पल्लेकल्ले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहेत. यादरम्यान सूर्यकुमारचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत संघाचा नेता म्हणून त्यांच्या मानसिकतेबद्दल बोलताना दिसत आहे.
स्टार स्पोर्ट्सने सोशल मीडियावर क्लिप शेअर केली, ज्यामध्ये सूर्यकुमारने त्याच्या कर्णधार कौशल्याबद्दल सांगितले. व्हिडिओ 2023 मधला आहे जेव्हा सूर्याने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-1 असा विजय मिळवून दिला आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 1-1 अशी बरोबरी साधली होती. व्हिडिओत सूर्यकुमार म्हणतोय, ‘मी या नव्या भूमिकेचा आनंद घेत आहे. मी सर्वांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घेत आहे आणि आम्ही सर्वांनी खूप फ्रँचायझी किंवा राज्य क्रिकेट खेळले आहे, त्यामुळे त्यांची ताकद आणि कमकुवतपणा समजून घेणे कठीण नाही. आम्ही मैदानाबाहेरही बराच वेळ घालवतो, त्यामुळे मैदानावर आमचा समन्वय चांगला होतो.’
.@surya_14kumar is the new T20 captain for #TeamIndia! 🇮🇳
Watch him talk about leading the team and the strong bond he shares with his teammates! 🫡💙#MenInBlue #SLvIND pic.twitter.com/BHILBqp5k3
— Star Sports (@StarSportsIndia) July 18, 2024
“माझ्यासाठी गोष्टी सोप्या ठेवणे महत्त्वाचे आहे, मी प्रक्रियेवर विश्वास ठेवणारी व्यक्ती आहे. मला गोष्टी सोप्या ठेवायला आवडतात आणि मी प्रयत्न करतो आणि प्रत्येकाला सांगतो की गोष्टी सोप्या ठेवण्याचा प्रयत्न करा. खूप काही करण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःला वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करू नका,” असे तो व्हिडिओत म्हणतोय.
महत्त्वाच्या बातम्या –
या 3 कारणांमुळे झाली रियान परागची भारतीय संघात निवड, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत ठरला होता फ्लॉप
संपुर्ण यादीः घटस्फोट घेतलेले 9 दिग्गज भारतीय क्रिकेटर्स, एकाने तर…
टीम इंडियाची घोषणा: गौतम गंभीरचा मास्टर प्लॅन? धोनीच्या विश्वासू खेळाडूला संघातून वगळलं!