लॉर्ड्समध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाची (Team india) चिंता वाढली आहे. रिषभ पंतच्या (Rishbh Pant) दुखापतीमुळे आधीच भारतीय संघ अडचणीत होता. आता आकाशदीपही (Aakashdeep) कसोटीच्या चौथ्या दिवशी जखमी झाला आहे. आकाशला लंगडत लंगडत मैदान सोडताना पाहण्यात आलं.
या सामन्याच्या महत्त्वाच्या दिवशी आकाश चांगल्या लयीत दिसत होता आणि त्याने हॅरी ब्रूकची मोठी विकेट घेतली. आकाशची दुखापत किती गंभीर आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही, पण ही गोष्ट भारतीय संघासाठी अजिबात चांगली नाही. पंत आधीच जखमी असून त्याच्या जागी ध्रुव जुरेल (dhruv Jurel) विकेटकीपिंग करत आहेत.
रिषभ पंतच्या दुखापतीमुळे आधीच त्रस्त असलेल्या भारतीय संघासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. संघातील महत्त्वाचा वेगवान गोलंदाज आकाशदीप दुखापतग्रस्त झाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आकाशदीप लंगडत मैदानाबाहेर गेला असून तो थेट ड्रेसिंग रूममध्ये परतला. त्याला बाउंड्रीवर संघाच्या फिजियोसोबत चर्चा करताना आणि वेदनेत असल्याचे पाहण्यात आले.
चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात आकाशने उत्तम गोलंदाजी करत जगातील नंबर एक फलंदाज हॅरी ब्रूकला क्लीन बोल्ड करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले. एजबॅस्टन कसोटी सामन्यात आकाश टीम इंडियाचा ट्रम्प कार्ड ठरला होता आणि त्याने दोन्ही डावांमध्ये मिळून तब्बल 10 विकेट्स घेतल्या होत्या. पण, आकाशची दुखापत किती मोठी आहे हे अद्याप समजू शकलेले नाही.
आकाशदीपच्या आधी रिषभ पंतही जखमी झाला होता. विकेटकीपिंग करताना एक चेंडू पंतच्या हातावर लागला आणि त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी ध्रुव जुरेलने पहिल्या डावात कीपिंग केली आणि दुसऱ्या डावातही तोच कीपर म्हणून खेळत आहे. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे पंतने पहिल्या डावात फलंदाजी केली होती. तरीसुद्धा, पंत अजूनही मेडिकल टीमच्या देखरेखीखालीच आहे.






