पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित व पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत प्रणव घोळकर याने 15 व 17 वर्षाखालील या दोन्ही गटात, तर पृथा वर्टीकरने 15 व19 वर्षाखालील या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, मोहिल ठाकूर, दिया शिंदे, वैभव दहिभाते व शुभंकर रानडे यांनी विजेतेपद संपादन केले.
पीवायसी क्लबच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत 11वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित मोहिल ठाकुर याने शारंग गवळीचा 11-5, 9-11, 14-12, 11-5 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. मोहिल हा सीएम इंटरनॅशनल शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून रेडीएन्ट स्पोर्ट्स अकादमीत प्रशिक्षक रोहित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तर, मुलींच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित दिया शिंदे हिने दुसऱ्या मानांकित श्रीनिका उमेदकरचा 11-1, 11-3, 11-3 असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.दिया ही नुमवी शाळेत पाचवी इयत्तेत शिकत आहे.
17वर्षांखालील मुलांच्या गटात अंतिम लढतीत अव्वल मानांकित प्रणव घोळकर याने सहाव्या मानांकित रामानुज जाधवचा 11-5, 11-9, 8-11, 11-8, 11-6 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. 19वर्षांखालील मुलींच्या गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकित पृथा वर्टीकर हिने दुसऱ्या मानांकित धनश्री पवारचा 4-11, 15-13, 17-19, 11-7, 11-7, 13-11 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. पृथा हि पीईएस मॉडर्न शाळेत अकरावी इयत्तेत शिकत असून डेक्कन जिमखाना येथे प्रशिक्षक सुनील बाबरस यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित पृथा वर्टीकर हिने रुचिता दारवटकरचा 11-5, 11-5, 11-8, 11-7 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
खुल्या दुहेरीत अंतिम फेरीत वैभव दहिभातेने शुभंकर रानडेच्या साथीत प्रणव मकवाना व ओंकार जोग यांचा 12-10, 11-8, 12-10 असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
पुरुष एकेरीत उपांत्य फेरीत पाचव्या मानांकित रजत कदम याने श्रेयस भोसलेचा 11-7, 11-6, 11-7, 9-11, 10-12, 12-10 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात बिगरमानांकित शुभांकर रानडे याने दुसऱ्या मानांकित भार्गव चक्रदेवचा 11-6, 7-11, 11-7, 7-11, 14-12, 13-11 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 11 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
मोहिल ठाकूर[1]वि.वि.पुष्कर चक्रदेव 15-13, 11-2, 11-8;
शारंग गवळी[3] वि.वि.दर्शन कांदळकर 11-3, 12-10, 11-3;
अंतिम फेरी: मोहिल ठाकूर[1]वि.वि.शारंग गवळी[3] 11-5, 9-11, 14-12, 11-5;
11 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
दिया शिंदे[1]वि.वि.सारा गांधी 9-11, 11-6, 11-9, 11-5;
श्रीनिका उमेकर[2]वि.वि.शरण्या प्रधान[3] 11-4, 11-7, 11-6;
अंतिम फेरी: दिया शिंदे[1]वि.वि.श्रीनिका उमेकर[2]11-1, 11-3, 11-3;
13 वर्षांखालील मुले: उपांत्य फेरी:
श्रेयस माणकेश्वर[1]वि.वि.आदित्य सामंत[4] 11-2, 6-11, 12-10, 8-11, 12-10, 13-11;
शौरेन सोमण[2]वि.वि.दर्शन कांदळकर[6]11-5, 11-4, 11-4, 11-2, 11-4;
13 वर्षांखालील मुली: उपांत्य फेरी:
आद्या गावत्रे[4]वि.वि.तनया अभ्यंकर[1]सामना सोडून दिला;
सई कुलकर्णी[5]वि.वि.मृदुला सुरवसे 11-3, 11-0, 11-4, 11-2;
17 वर्षांखालील मुले: अंतिम फेरी:प्रणव घोलकर[1]वि.वि.रामानुज जाधव[6]11-5, 11-9, 8-11, 11-8, 11-6;
19वर्षांखालील मुली: अंतिम फेरी: पृथा वर्टीकर[1]वि.वि.धनश्री पवार[2]4-11, 15-13, 17-19, 11-7, 11-7, 13-11;
खुली दुहेरी: उपांत्य फेरी:प्रणव मकवाना/ओंकार जोग वि.वि.वरुण सिंग/अंकित सिंग 1-11, 11-4, 8-11, 11-8, 11-9;
वैभव दहिभाते/शुभंकर रानडे वि.वि.भार्गव चक्रदेव/अर्चन आपटे 10-12, 11-8, 11-7, 11-7;
अंतिम फेरी: वैभव दहिभाते/शुभंकर रानडे वि.वि.प्रणव मकवाना/ओंकार जोग 12-10, 11-8, 12-10.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: रिषभ पंतच्या षटकारामुळे लक्ष्मण-चाहर यांच्यात वादाची ठिणगी, वाचा नेमके काय झाले ते
बाबर की विराट? कोणाला गोलंदाजी करणे आहे कठीण? राशिदने दिले उत्तर
मुंबईचे क्रीडापटू मयूर व्यास यांचा ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’च्या ‘लाइफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड्स’ ने गौरव