येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचा थरार पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा मेगा ऑक्शन सोहळा पार पडणार आहे. तसेच या स्पर्धेत लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन नवीन संघ खेळताना दिसणार आहेत. या दोन्ही संघांनी ६ खेळाडूंना रिटेन केले आहे. त्यापैकी काही खेळाडू असे देखील आहेत ज्यांना वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी२० संघात स्थान देण्यात आले आहे. (India vs West Indies)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका पार पडणार आहे. या मालिकेसाठी बुधवारी (२६ जानेवारी ) १८ सदस्यीय खेळाडूंची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये असे देखील काही खेळाडू आहेत, ज्यांना लखनऊ आणि अहमदाबाद संघाने मोठी किंमत मोजून रिटेन केले आहे. तसेच भारतीय संघात देखील स्थान मिळाले आहे.
१) रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) :
युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईला वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. आयपीएल स्पर्धेत आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याची या संघात निवड केली आहे. रवी बिश्नोईसाठी हा डबल धमाका आहे. कारण काही दिवसांपूर्वीच लखनऊ सुपर जायंट्स संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली होती. यामध्ये रवी बिश्नोईचे देखील नाव होते. त्याला ४ कोटी रुपये देऊन लखनऊ संघाने रिटेन केले आहे. गतवर्षी त्याने पंजाब किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
२) केएल राहुल (Kl Rahul) :
नुकताच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेत केएल राहुलला भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. परंतु तो कर्णधार म्हणून पूर्णपणे फ्लॉप ठरला. ही मालिका सुरू असतानाच त्याला आनंदाची बातमी मिळाली होती. पंजाब किंग्ज संघामधून रिलीज होऊन बाहेर पडलेल्या केएल राहुलला लखनऊ सुपर जायंट्स संघाने रिटेन केले आहे. त्याला या संघाने १७ कोटी रुपये खर्च करत रिटेन केले आहे. आगामी हंगामात तो या संघाचे नेतृत्व करताना दिसून येऊ शकतो.
वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.
महत्वाच्या बातम्या :
कोण असेल भारताचा पुढील कर्णधार? स्मिथने टाकले ‘या’ दोघांच्या पारड्यात वजन
मलिंगा इज बॅक! ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुन्हा दिसणार श्रीलंकेच्या डग आऊटमध्ये
हे नक्की पाहा: