आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१४ नोव्हेंबर) पार पडणार आहे. पाकिस्तान संघाला पराभूत करून ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. तर इंग्लंड संघाला धूळ चारत न्यूझीलंड संघाने पहिल्यांदाच आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. दोन्ही संघांना आतापर्यंत एकदाही जेतेपद मिळवता आले नाहीये. त्यामुळे जो संघ जेतेपद मिळवणार तो संघ इतिहास रचणार आहे.
तसेच या दोन्ही संघांचा आतापर्यंतचा रेकॉर्ड पहिला तर हे दोन्ही संघ १४ वेळेस आमने सामने आले आहेत. ज्यापैकी, ऑस्ट्रेलिया संघाने ९ वेळेस विजय मिळवला आहे तर न्यूझीलंड संघाला ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तत्पूर्वी आम्ही तुमच्यासाठी या दोन्ही संघातील सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत. चला तर जाणून घेऊया न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यातील ड्रीम ११ संघ.
सामन्याविषयी अधिक माहिती
सामना – न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, अंतिम सामना
ठिकाण – दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई
दिनांक आणि वेळ – रविवार १४ नोव्हेंबर, २०२१, संध्याकाळी ७:३० वाजता.
लाईव्ह स्ट्रीमिंग – स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डीज्नी- हॉटस्टार
दोन्ही संघांची संभावित प्लेइंग ईलेव्हन
न्यूझीलंड – मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, केन विलियमसन (कर्णधार), टिम सेफर्ट (यष्टिरक्षक), जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, इश सोधी, ॲडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट आणि टीम साउदी
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, आरोन फिंच (कर्णधार), मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झांपा आणि जोश हेझलवूड
या सामन्यासाठी अशी असू शकते ड्रीम ११ टीम –
यष्टीरक्षक – मॅथ्यू वेड
फलंदाज – डेविड वॉर्नर, मार्टिन गप्टील, स्टीव्ह स्मिथ, केन विलियमसन
यष्टीरक्षक – ग्लेन मॅक्सवेल, मिचेल सॅंटनर
गोलंदाज – मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, ॲडम झांपा, ईश सोढी
कर्णधार – मार्टिन गप्टील
उपकर्णधार – स्टीव्ह स्मिथ
महत्त्वाच्या बातम्या-
Video: ‘द ग्रेट’ खलीने फुटबॉलने खेळले क्रिकेट; चाहते म्हणाले, ‘आभाळाला छिद्र पडेल’
ऑस्ट्रेलिया संघातून बाहेर झाल्यानंतर ‘तो’ बनला होता सुतार, अवघ्या ३ चेंडूंनी वाचवली संपूर्ण कारकीर्द