इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा ५१ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. मंगळवार रोजी (०५ ऑक्टोबर) शारजाहच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघ सध्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यात १० गुण आहेत. तर संजू सॅमसनच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान संघ मुंबईपेक्षा एका स्थानाने पुढे आहे. अर्थातच १० गुणांसह हा संघ सहाव्या स्थानावर आहे.
अशात समान गुण असलेल्या उभय संघांसाठी हा सामना ‘करा अथवा मरा’ असा असणार आहे. दोन्हीही संघांचा नेट रन रेटही कमी आहे. त्यामुळे त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.
सर्वांच्या नजरा असलेल्या या लढतीपूर्वी आम्ही तुमच्यासाठी या सामन्यासाठीच्या सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया, मुंबई विरुद्ध राजस्थान सामन्यासाठीचा ड्रीम ११ संघ कसा असेल?
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, नाथन कुल्टर नाईल, राहुल चाहर/जयंत यादव, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.
राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शिवम दुबे, ग्लेन फिलिप्स, डेविड मिलर, राहुल तेवातिया, मयंक मार्कंडे, चेतन साकरिया, कार्तिक त्यागी/आकाश त्यागी, मुस्तफिजुर रहमान.
या सामन्यात हे ११ खेळाडू असू शकतात ड्रीम इलेव्हन संघात:
कर्णधार- संजू सॅमसन
उपकर्णधार- जसप्रीत बुमराह
यष्टीरक्षक – संजू सॅमसन, क्विंटन डी कॉक
फलंदाज – रोहित शर्मा, सौरभ तिवारी, एविन लुईस, यशस्वी जयस्वाल
अष्टपैलू- राहुल तेवतिया, शिवम दुबे
गोलंदाज – ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, चेतन साकारिया
महत्त्वाच्या बातम्या-
चुरशीच्या लढतीनंतरही पराभूत झाल्याने सीएसकेच्या ताफ्यात निराशेची लहर, धोनी अन् रैनाची पत्नी तर…
चेन्नईविरुद्ध आयपीएल अध्यायाची सुरुवात करणारा रिपल पटेल आहे तरी कोण? ‘अशी’ राहिलीय कारकिर्द






