विवो कंपनीने भारत आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी त्यांच्या प्रायोजकतेच्या करारातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आयपीएलच्या १३व्या हंगामासाठी नवीन स्वतंत्र प्रायोजकाचा बीसीसीआयला शोध होता. म्हणून बीसीसीआयने टायटल स्पॉन्सरशीपच्या अधिकारांंसाठी लिलावाचे आयोजन केले होते. यामध्ये ड्रीम ११ ने पुढील ३ वर्षांसाठी आयपीएलच्या १३व्या हंगामाचे प्रायोजकत्व विकत घेतले आहे.
आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपसाठी ड्रीम ११, टाटा सन्स आणि भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख प्रायोजक असलेल्या बायजूस व अनअकॅडमी यांनी आयपीएलचे प्रायोजक होण्यासाठी निविदा भरली होती. पण, ड्रीम११ ने पहिल्या वर्षासाठी २२२ कोटी रुपये, दूसऱ्या वर्षासाठी २४० कसोटी रुपये आणि तिसऱ्या वर्षासाठी २४० कोटी रुपयांची बोली लावत बाजी मारली.
दरम्यान बिहार क्रिकेट असोसिएशनचे सचिव आदित्य वर्मा यांनी म्हटले आहे की, “ड्रीम११ ला आयपीएलचे स्पॉन्सरशीप मिळाल्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या स्वप्नाला मोठा झटका बसणार आहे. कारण, ड्रीम११ ही एक चिनी कंपनी आहे. भारतीय क्रिकेटचा शुभचिंतक असल्यामुळे मला वाटते की, आयपीएल २०२०चे आयोजन यशस्वीपणे व्हावे. पण, ड्रीम११ ला आयपीएल टायटलचा स्पॉन्सर बनल्यामुळे पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे स्वप्न भंगणार आहे.”
भारतात गेल्या काही दिवसांपासून ज्याप्रकारे चिनी वस्तूंचा निषेध केला जात आहे. ते पाहून बीसीसीआयने ड्रीम११ चा बचाव करत स्पष्ट केले आहे की, “ड्रीम११ ही एक भारतीय स्टार्ट अप कंपनी आहे. त्यांच्या युनिटमध्ये चिनी गुंतवणूकीचा समावेश आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. आपापसात चर्चा केल्याने ही समस्या सोडवली जाऊ शकते.”
विषेश म्हणजे, ड्रीम११ कंपनीने बीसीसीआयला आयपीएलचे टायटल स्पॉन्सरशीप विकत घेण्यासाठी जी रक्कम दिली आहे, ती चिनी स्मार्टफोन कंपनी विवोच्या रक्कमेपेक्षा आर्धी आहे. याविषयी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “सध्या मार्केटमधील परिस्थिती पाहता एवढा पैसा ठीक आहे. बीसीसीआय अजून अनअकॅडमी आणि क्रेड या २ पार्टनरला सोबत जोडणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला अजून ८० कोटी रुपये जास्त मिळतील. एकंदरीत पूर्ण रक्कम ३०० कोटींपेक्षा जास्त असेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
२०११ विश्वचषकातील धोनीचा विजयी षटकार ज्या ठिकाणी पडला होता, ती सीट होणार धोनीच्या नावावर?
सीपीएलच्या पहिल्याच सामन्यात सुनील नारायणचा जलवा; अष्टपैलू कामगिरीने मिळवून दिला संघाला विजय
पाकिस्तानविरुद्ध टी२० मालिकेसाठी इंग्लंड संघ सज्ज; या १४ खेळांडूंची झाली संघात निवड
ट्रेंडिंग लेख –
धोनी-रैनानंतर ‘हे’ ५ भारतीय खेळाडू देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करु शकतात अलविदा
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीचे ५ असे निर्णय, ज्याचा झाला टीम इंडियाला मोठा फायदा
धोनीच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाकडे आहेत या ५ युवा यष्टीरक्षकांचा पर्याय