टी20 विश्वचषकाच्या ऐन तोंडावर ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान तीन सामन्याच्या टी20 मालिकेला क्वीन्सलॅंड येथे सुरुवात झाली. कमी धावसंख्येचा होऊनही हा पहिला सामना अत्यंत रोमांचक झाला. ऑस्ट्रेलियाने तीन गडी राखून विजय संपादन करून मालिकेत आघाडी घेतली. या सामन्यात डीआरएस घेताना एक अशी घटना घडली ज्यामुळे फलंदाज, गोलंदाज आणि इतर खेळाडूंनाही विश्वास बसेनासा झाला.
वेस्ट इंडिजच्या डावाच्या 11व्या षटकात सदर घटना घडली. मिचेल स्टार्कने षटकातील पाचवा चेंडू अचूक यॉर्कर टाकला. समोर फलंदाजी करत असलेला वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरन या चेंडूचा सामना करू शकत नाही आणि चेंडू पायाला लागल्यानंतर तो जमिनीवर पडला. पूरनच्या बॅटला चेंडू लागल्याचे प्रथमदर्शनी दिसले. तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अपील करत डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला.
Mitchell Starc reacts to that strange lbw verdict, suggesting an off-centre replay camera was the reason the ball-tracking caught everyone off guard with three reds @alintaenergy | #AUSvWI pic.twitter.com/1qWuE6IBdr
— cricket.com.au (@cricketcomau) October 5, 2022
पहिले काही रिप्ले पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पूरन नाबाद असल्याचे जाणवले. खरंतर चेंडू पूरनच्या पायाला लागलेला दिसत होता. परंतु, रिप्ले पाहून चेंडू लेग-स्टंप सोडून बाहेर जाईल असं वाटत होते. अशा परिस्थितीत सर्व खेळाडू आपापल्या ठिकाणी परतायला लागले. मात्र, जेव्हा तिसऱ्या पंचांनी पायचितसाठी बॉल ट्रॅकिंगचा वापर केला तेव्हा, चेंडू स्टम्पवर आदळत असल्याचे दिसून आले.
हे सर्व घडत असताना ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर गेले होते. तर मिचेल स्टार्कही पुढील चेंडू टाकण्यासाठी रन अप घेत होता. मात्र, पंचांनी बाद म्हणून निर्णय दिल्यानंतर सर्वांनी एकच जल्लोष केला.
या मालिकेत आणखी दोन सामने खेळले जातील. त्यानंतर 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा माझे आदर्श’, पहिल्या वनडेपूर्वीच खेळाडूचे मोठे वक्तव्य
पांढरे केस, पांढरे जॅकेट अन् हातात माईक, रिची बेनो बोलायला लागले की, ऐकणाऱ्याचे कान व्हायचे तृप्त