ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस आणि सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर संघातून बाहेर झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामनयात हे दोघेही खेळणार नाहीत. डेविड वॉर्नरला संघ व्यवस्थापनाकडून विश्रांती दिली गेली आहे. पण स्टॉयनिस मात्र दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाला आहे. अशात भारताविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेतून देखील त्याला माघार घ्यावी लागू शकते. दरम्यान, स्टॉयनिसची दुखापत ही भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मार्कस स्टॉयनिस (Marcus Stoinis) तसेही अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. त्याने फलंदाजी करताना दोन सामन्यांमध्ये अवघ्या 6 चेंडूंचा सामना केला आणि दुसऱ्या सामन्यात तीन षटके गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 113 धावांनी जिंकला. स्टॉयनिसच्या दुखापतीविषयी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माहिती दिली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे की, “स्टॉयनिस पर्थमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करेल. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला 21 ते 26 सप्टेंबरदरम्यान तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात जायचे आहे. या मालिकेपूर्वी फिट होण्यासाठी स्टॉयनिसकडे एक आठवडा आहे.” दरम्यान बोर्डाकडून डेविड वॉर्नर (Devid Warner) याला दुखापत झाली नसून त्याला विश्रांती दिली गेल्याचे सांगितले गेल आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात दुखापत झालेल्या खेळाडूंऐवजी नाथन एलिस याला संघात घेतले गेले आहे. मालिकेतील हा शेवटचा सामना रविवारी (11 सप्टेंबर) केर्न्समध्ये खेळला जाईल.
दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील रविवारी खेळला जाणारा हा सामना कर्णधार एरॉन फिंचसाठी त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरला. फिंचने आधीच तो एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचे सांगितले होते. असे असले तरी या मालिकेनंतर भारत दौऱ्यातील टी-20 मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ फिंचच्याच नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील ही मालिका 20 सप्टेंबर रोजी सुरू होईल.
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडलेला ऑस्ट्रेलिया संघ –
एरोन फिंच (कर्णधार), सीन एबॉट, एश्टन एगर, एलेक्स कैरी, कैमरून ग्रीन, जोश हेजलवुड, मार्नस लाबुशेन, मिशेल मार्श, ग्लेन मैक्सवेल, स्टीवन स्मिथ, मिशेल स्टार्क और एडम जम्पा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकातून निराशा घेऊन टीम इंडिया भारतात! आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर असेल खास लक्ष्य
टी20 विश्वचषकासाठी नेहराने निवडला भारताचा संघ, टीमबाहेर असलेल्या ‘या’ गोलंदाजाला संधी
आशिया चषकातील हाराकिरीनंतर अफगाणिस्तानचा संघ संकटात, लंडनमध्ये बसलाय अडकून